महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणपती बाप्पावर 'महाकाल'कडून पुष्पवृष्टी, विसर्जन मिरवणुकीचं ठरलं आकर्षण - Ganesh visarjan 2024

Mumbai Ganesh visarjan गणेशोत्सव अत्यंत धामधुमीत साजरा झाल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी भाविकांनी जड अंत:करणानं आपल्या लाडक्या गणरायाला "पुढील वर्षी लवकर या," अशा घोषणा देत निरोप दिला आहे. यादरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू असताना गणरायावर अवकाशातून मैत्री फाऊंडेशनकडून 'महाकाल' पुष्पवृष्टी करत असल्याचं दृश्य भाविकांना भायखळा येथे पाहायला मिळाले.

Mumbai Ganesh visarjan 2024
मुंबई गणपती विसर्जन मिरवणूक (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 12:07 PM IST

Updated : Sep 18, 2024, 12:19 PM IST

मुंबई Mumbai Ganesh visarjan - मुंबईतील लालबाग, परळ काळाचौकी, नाम जोशी मार्ग, लोअर परळ हा विभाग मध्यमवर्गीय मुंबईकरांचा विभाग म्हणून ओळखला जातो. या भागात अजूनही गिरणी कामगार आणि त्यांचे वारस राहत असल्यानं गिरणगाव म्हणून हा विभाग ओळखला जातो. या विभागात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आजही टिकून आहे.

मुंबई गणपती विसर्जन मिरवणूक (Source- ETV Bharat Reporter)

गिरणगावात सर्व उत्सव मोठ्या उत्साहानं आणि दिमाखात साजरे होतात. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजूकायाचा राजा, महागणपती, परळचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणपती याच परिसरात आहेत. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. आपल्या लाडक्या गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी वाजत-गाजत भाविक जात असतात. मिरवणुकीत गणरायावर ठिकठिकाणी ओवाळणी आणि पुष्पवृष्टी केली जाते. गेल्या पंधरा वर्षांपासून भायखळा येथील मैत्री फाउंडेशन या संस्थेनं आकाशातून पुष्पवृष्टी सुरू केली आहे. पुष्पवृष्टी करणारे यान वेगवेगळ्या आकारात तयार केले जाते. कधी कमळाच्या, कधी शंकराच्या पिंडीच्या आकारात हे यान असते. यंदा हे यान उज्जैन येथील 'महाकाल' रुपात तयार करण्यात आलं आहे.


दिवसभरात शेकडो गणरायांवर पुष्पवृष्टी-विनायक नेवगे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला आता उदंड प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात दीडशेपेक्षा अधिक गणरायांवर या यानातून पुष्पवृष्टी केली जात असल्याची माहिती मैत्री फाऊंडेशनचे कार्यकर्ते संदीप कांडगे यांनी दिली. यावेळी बोलताना विनायक नेवगे यांनी सांगितले की, "मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभरात आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. लोकांच्या हिताचे उपक्रम राबवत असताना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही स्वतःहून कृत्रिम तलावही तयार केला होता. मात्र महानगरपालिकेनं ही जबाबदारी प्रशासनाची असून आम्ही तयार करू असे सांगितले. त्यामुळे आम्ही गणरायावर पुष्पवृष्टी करतो. यादरम्यान भाविकांना काही आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्या तर त्याचीही व्यवस्था मैत्री फाऊंडेशनच्या वतीनं करण्यात येते."

"या पुष्पवृष्टी यासाठी तयारी करावी लागते. या दिवशी आम्ही 150 ते 200 किलो फुलांची उधळण गणपती बाप्पावर करीत असतो. बापावर होणारी पुष्पवृष्टी पाहून भाविक आनंदित होतात. त्यासाठी या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी होते," असेही नेवगे यांनी सांगितलं.

हेही वाचा-

  1. गणेश विसर्जन 2024 : सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंताचं 'तांडव' नृत्य, बघण्यासाठी नाशिककरांची तोबा गर्दी - Ganesh Visarjan 2024
  2. 'मुंबईचा राजा' गणपती बाप्पाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन; आतापर्यंत 19,996 गणपती बाप्पाला भाविकांचा निरोप - Ganesh Visarjan 2024
Last Updated : Sep 18, 2024, 12:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details