महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दर्ग्यात दहशतवाद्यांच्या प्रवेश झाल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अटक - false information

Mumbai Crime : दर्ग्यात दहशतवाद्यी घुसल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी आरोपी 'नजरुल'ला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यानं डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरनाल येथील टेलिफोन बूथवरून दर्ग्यात दोन दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती.

Mumbai Crime
Mumbai Crime

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 8:24 PM IST

Updated : Feb 16, 2024, 10:21 PM IST

मुंबईMumbai Crime :डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरनाल येथील टेलिफोन बूथवरून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दर्ग्यात दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देण्यात आली होती. या संदर्भात डोंगरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात आरोपी नजरुलला (वय 70) अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं. त्याला जामीन मंजूर झाल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद मोरे दिली आहे.

दहशतवादी घुसल्याची दिली खोटी माहिती : आरोपी नजरुल हा मानसिक आजारी असून विक्रोळी येथील झोपडपट्टीत राहतो. आरोपीनं डोंगरी परिसरात येऊन चार नळ येथील टेलिफोन बुथवरून हॉक्स कॉल केल्याचं उघडकीस आलं आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास नजरुलनं फोन करत एका महिलेसह एक पुरुष असे दोन दहशतवादी दर्ग्यात घुसल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. त्यांच्याकडं रायफल असल्याची खोटी माहितीदेखील त्यांनं पोलिसांना फोनवर सांगितली होती.

अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल :या प्रकरणी पोलिसांना फोन येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कुठंही दहशतवादी न आढळल्यानं डोंगरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळं सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशानं अज्ञात आरोपींनी खोटी माहिती दिल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

आरोपीला जामीन : या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश साबणे यांच्या फिर्यादीवरून डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रं जोमानं फिरवली. चरनाल येथील एका टेलिफोन बूथवरून हा कॉल आल्याचं समोर आलं. परिसरात सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यानं आरोपींचा शोध घेणं कठीण झालं होतं. मात्र, आरोपींपर्यंत पोहोचण्याचं आव्हान पोलिसांनी यशस्वीपणं पूर्ण करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलंत का :

  1. छत्रपती शिवरायांचा जयघोष इंग्लंडमध्ये! लंडनच्या आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरमध्ये उभारणार शिवस्मारक
  2. परवानगी द्या, शिवजयंतीपासून आम्ही शिवप्रेमी स्मारकाचं हाती घेऊ- विनोद पाटील यांची मागणी
  3. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर राजकीय सुंदोपसुंदी, छगन भुजबळांनी काय उपस्थित केले प्रश्न?
Last Updated : Feb 16, 2024, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details