महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शॅम्पू आणि हॅन्ड लिक्विड बाटलीत सापडलं 20 कोटींचं कोकेन; मुंबई विमानतळावरून परदेशी महिलेला ठोकल्या बेड्या - Cocaine Seized - COCAINE SEIZED

Cocaine Seized : केनियाच्या नैरोबीहून येत असलेल्या या महिला प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकानं विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. महिलेकडून एकूण 1,983 ग्रॅम स्निग्ध द्रवपदार्थ जप्त करण्यात आला.

Cocaine Seized
फाईल फोटो (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 11:01 PM IST

Updated : Aug 17, 2024, 9:03 AM IST

मुंबई Cocaine Seized :आंतरराष्ट्रीय विमानतळावर 20 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी 20 कोटी रुपयांच्या कोकेनची तस्करी केल्याप्रकरणी नैरोबीहून आलेल्या केनियाच्या महिला प्रवाशाला अटक केली आहे. द्राव्य स्वरूपात कोकेनची तस्करी सुरू होती. शॅम्पू आणि हॅन्ड लिक्विड बाॅटल्समधून कोकेनची तस्करी केली जात होती. याप्रकरणी नैरोबी येथून आलेल्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आलीय.

गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. महिलेकडे असलेल्या सामानाची कसून तपासणी केली असता अधिकाऱ्यांना धक्का बसला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी महिलेकड एक संशयास्पद पदार्थ सापडला. तपासणी केली असता डीआरआयच्या अधिकाऱ्यांना महिलेच्या बॅगेत दोन शॅम्पू आणि हॅन्ड लिक्विडच्या बाॅटल सापडल्या. या बाॅटल्समध्ये 1983 ग्रॅम वजनाचं चिकट द्रव आढळून आलं. या द्रव्याची चाचणी केल्यावर हा चिकट पदार्थ नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा, 1985 अंतर्गत बंदी घालण्यात आलेले कोकेन असल्याचं समोर आलं. जप्त केलेल्या कोकेनची बाजारपेठेत अंदाजे किंमत 20 कोटी इतकी आहे.

  • 2022 मध्ये 13 कोटी रुपयांचं ब्लॅक कोकेन जप्त :अंमली पदार्थ तस्करांनी यापूर्वीही मुंबईत कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या अधिकाऱ्यांनी 2022 मध्ये मुंबई विमानतळावर बोलिव्हियन महिलेकडून 13 कोटी रुपयांचं ब्लॅक कोकेन जप्त केलं होतं.

हेही वाचा

  1. ४० वर्षापूर्वी बलात्काराचा आरोप, त्याच मुलीशी लग्न, ४ मुलं आता ७०व्या वर्षी निर्दोष मुक्तता; वाचा काय आहे प्रकरण - Mumbai Crime News
  2. धक्कादायक : मित्रांनी तीन मैत्रिणीचे मॉर्फ फोटो सोशल माध्यमात केले व्हायरल, दहावीतील मित्रांवर गुन्हा दाखल - Teen Girls Morphed Photo Viral
  3. सहाय्यक कामगार आयुक्तांनी महिलेचा केला विनयभंग, पदोन्नतीच्या बहाण्यानं कार्यालयात बोलावलं अन्... - Woman Molesting In Mumbai
Last Updated : Aug 17, 2024, 9:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details