मुंबई - Mumbai Monsoon Update : लोकसभा निकडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. मुंबईकर उकड्यानं पहिलेच हैराण झाले असतांना लोकसभा मतमोजणीमुळे मुंबईत राजकीय वातावरण देखील तापलं होतं. मुंबईसह उपनगरात अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. हलक्या सरी तर चांगला पाऊस बरसल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांची सकाळ काहीशी दिलासादायक झाली आहे.
येत्या पाच दिवसात पावसाचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसात कोकणात रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजांचा कडकडाट सह वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठाणे जिल्ह्यात 5 ते 8 जून तर मुंबई शहर आणि उपनगरात 6 ते 8 जूनला वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सात जून रोजी वीजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहण्याचा अंदाज देखील हवमान खात्यानं वर्तवंला आहे.
हेही वाचा -