महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धोनी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत कधी येणार, पत्नी साक्षीनं दिलं 'हे' महत्त्वाचं अपडेट

MS Dhoni Shirdi : महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं नुकतंच आपल्या आई-वडिलांसह शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर तिनं एमएस धोनी शिर्डीला कधी येणार याची माहिती दिली. वाचा पूर्ण बातमी..

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 8:53 AM IST

Updated : Feb 2, 2024, 10:26 AM IST

शिर्डी MS Dhoni Shirdi : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त करोडोंच्या संख्येत आहेत. देशभरातील अनेक प्रसिद्ध फिल्मस्टार्स, राजकारणी तसेच क्रिकेटपटू साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सातत्यानं शिर्डीला येत असतात. आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येणार आहे. त्याची पत्नी साक्षी धोनीनं स्वत: ही माहिती दिली.

साक्षी धोनीनं साईबाबांचं दर्शन घेतलं

आई - वडिलांसह शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन : महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं 31 जानेवारीला तिच्या आई - वडिलांसह शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी तिनं साईबाबांच्या आरतीलाही हजेरी लावली. साक्षी धोनीनं आई - वडिलांसह द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं त्यांचा साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

साक्षी धोनीनं साईबाबांचं दर्शन घेतलं

कोरोना महामारी पूर्वी शिर्डीत आली होती : यावेळी साक्षी धोनीबरोबर शिर्डीतील उद्योजक संग्राम देशमुख आणि अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते उपस्थित होते. साक्षीनं कोते यांच्याशी शिर्डीसह राज्यातील अनेक विषयांवर चर्चा केली. "आम्ही कोरोना महामारी पूर्वी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो", असं तिनं यावेळी सांगितलं. त्यानंतर आज साईबाबांचं बोलवणं आल्यानं मी आई-वडिलांना सोबत घेऊन आल्याचं साक्षी धोनी म्हणाली.

लवकरच धोनीला घेऊन शिर्डीत येणार : साईबाबांनी आम्हाला सर्व काही दिलं आहे. आज मी देशाच्या सुख - शांतीसाठी आणि कुटुंबीयांसाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्याचं साक्षी धोनी म्हणाली. आता लवकरच पती महेंद्रसिंह धोनी याला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत घेऊन येणार असल्याचं साक्षी धोनीनं नमूद केलं.

हे वाचलंत का :

  1. साई चरणी 29 लाखांचा सुवर्ण मुकुट दान, साईबाबा संस्थानच्या वतीने भक्ताचा सत्कार
  2. निवृत्तीच्या पैशातून आणि मातृ प्रेमातून साई चरणी केली रुग्णवाहिका दान
  3. साईचरणी 10 दिवसात 16 कोटी रुपयांचं दान, 8 लाख साईभक्तांनी घेतलं दर्शन
Last Updated : Feb 2, 2024, 10:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details