महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी - Bomb Threats - BOMB THREATS

Bomb Threats to Hospitals : मुंबईतील अनेक नामवंत रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर धमकीचे ईमेल आले आहेत. ज्यामध्ये जसलोक रुग्णालय, रहेजा रुग्णालय, सेव्हन हिल रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय, केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालयसह इथर रुग्णालयांचा समावेश आहे. VPN नेटवर्क धमकी देण्यासाठी करण्यात आला आहे.

Bomb Threats
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 10:54 PM IST

मुंबई Bomb Threats to Hospitals:मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना धमकीचे ईमेल आले आहेत. ई-मेल पाठवणाऱ्यानं रुग्णालयांच्या बेडखाली तसंच बाथरुममध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, धमकीचा ईमेल परदेशी VPN नेटवर्क वापरून पाठवलाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर धमकीचे ईमेल आले आहेत. Beeble.com वरील ईमेल आयडीवरून धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता, ज्याचा सर्व्हर सायप्रसमध्ये आहे. तसंच, अज्ञात आरोपींनी वापरलेले व्हीपीएन स्वित्झर्लंड तसंच जर्मनीचे असल्याचं समजतंय.

आरोपीचा शोध सुरू : ईमेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं एक ईमेल 50 हून अधिक रुग्णालयांना पाठवला आहे. मुंबईतील रुग्णालयांना धमकीचा ईमेल मिळताच त्यांनी पोलिसांना याबात माहिती दिलीय. त्यानंतर पोलीस तसंच बॉम्बशोधक पथकानं रुग्णालयांमध्ये झडती घेतली असता संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती एका एधिकाऱ्यानं दिली आहे. यापूर्वी देखील मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. मात्र, यावेळी थेट हॉस्पिटलला ईमेलद्वारे धमकी आल्यानं मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

देशभरातील 41 विमानतळांना बॉम्बनं उडण्याची धमकी :

देशातील पाटणा, कोईम्बतूर, वडोदरा, दिल्ली, चेन्नई, जयपूरसह प्रमुख विमानतळांना मंगळवारी बॉम्बनं उडण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं अनेक विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला. ईमेलद्वारे पाठवलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळं मंगळवारी देशभरातील अनेक विमानतळांवर उड्डाण सेवा विस्कळीत झाली. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळं उड्डाणांच्या वेळापत्रकात विलंब होत आहे. या ईमेलची सखोल चौकशी केल्यानंतर धमक्या खोट्या असल्याचं निष्पन्न झालं. आज तब्बल 40 विमानतळांना बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाले आहेत. सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आज सकाळी चेन्नईच्या कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाणाऱ्या एमिरेट्सच्या विमानात बॉम्ब असल्याचा ई-मेल पाठवण्यात आला. त्यानंतर जयपूर विमानतळ प्राधिकरणाला विमानतळावर स्फोटके लपवून ठेवल्याचा मेल आला होता.

'हे' वाचलंत का :

  1. Lalit Hotel Bomb Threat 5 कोटी द्या अन्यथा मुंबईचे ललित हॉटेल उडवून देऊ
  2. अमित शहा यांच्यासह योगी अन् आसामचे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; पहा काय आहे माहिती
  3. निकाल जाहीर करा.. अन्यथा मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट घडवून आणू, ई-मेलवरून धमकी!

ABOUT THE AUTHOR

...view details