महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मित्राच्या मुलीवरच पोलीस निरीक्षकाची वाईट नजर, चक्क न्यूड फोटोची मागणी केल्याचा आरोप - Molestation Case Against PI

Molestation Case Against PI : अकोला येथील एका पोलीस निरीक्षकाने नागपुरातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीवर वाईट नजर टाकली. अखेर पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे साधारण गुन्ह्यातही तत्परता दाखवणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पोलीस निरीक्षकाला अटक केलेली नाही. गंभीर बाब म्हणजे आरोपीने पीडित तरुणीकडे न्यूड फोटोची मागणी केली होती, असा आरोप आहे.

Molestation Case Against PI
विनयभंग (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 5:53 PM IST

नागपूरMolestation Case Against PI:अकोला येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकावर नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने पोलीस खात्यातचं नोकरीवर असलेल्या त्यांच्या मित्राच्या मुलीवर वाईट नजर टाकली. त्यांनी पीडित तरुणीकडे न्यूड फोटो पाठवण्याचा तगादा लावला होता. मात्र, पीडिता ही आरोपीला प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी थेट नागपूर गाठून पीडित तरुणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने नंदनवन पोलीस ठाण्यात आरोपी पीआय विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचे तरुणीवर एकतर्फी प्रेम :२२ वर्षीय पीडित तरुणी ही नागपूर येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. तिचे वडील आणि पोलीस निरीक्षक हे एकाच वेळी पोलीस खात्यात नोकरीला लागले होते. आरोपी हा डिपार्टमेंटल परीक्षा उत्तीर्ण करत पोलीस निरीक्षक झाला. आरोपी हा तरुणीच्या वडिलांचा मित्र असल्याने त्याचे पीडित तरुणीच्या घरी अधूनमधून येणे-जाणे होते. आरोपी हा पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागल्याने तिला महागडे गिफ्ट देत असे.

न्यूड फोटो पाठवण्याची केली मागणी : आरोपी हा वडिलांचा मित्र असल्याने पीडिता त्याला काका म्हणायची. म्हणून तरुणीने त्याच्याकडून काही गिफ्टही घेतले. आरोपीने पीडित तरुणीला आयफोन गिफ्ट केला होता. आरोपी व्हाट्सएपच्या माध्यमातून तिला मॅसेज करायचा आणि ती देखील त्याला उत्तर द्यायची. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने पीडित तरुणीला अश्लील मॅसेज पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या मुलीने दुर्लक्ष केले; मात्र, त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. त्याने पीडित तरुणीला स्वत:चे न्यूड फोटो सेंड केले आणि त्या पीडित तरुणीलासुद्धा तिचे न्यूड फोटो पाठवण्यासाठी दबाव टाकू लागला होता.

पीडितेला हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले आणि.. :आरोपी पोलीस निरीक्षकाचे वर्तन अचानक बदलल्याने पीडित तरुणीने त्याला प्रतिसाद देणे टाळले. त्यामुळे आरोपी चांगलाच संतापला होता. त्याने थेट नागपूर गाठून पीडित तरुणीस हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. पीडित तरुणी आरोपीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली तेव्हा त्याने तिला शारीरिक संबंधासाठी मारहाण केली आणि तिचा मोबाईलही हिसकावला. त्यामुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरलेली होती. तिने घटनास्थळावरून कसाबसा पळ काढला आणि थेट नंदनवन पोलीस ठाणे गाठून आरोपी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.


पोलीस निरीक्षकाला अटक केव्हा? :पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात अकोल्याच्या संबंधित पोलीस निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. लहानसहान गुन्ह्यात तत्परतेने कारवाई करणारे नागपूर पोलीस या प्रकरणात मात्र, नरमाईची भूमिका तर घेत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

  1. दक्षिण मध्य मुंबईत मतदान केंद्रावर घोळ; मतदारांची नावं गायब, आयोगापुढे डोकं आपटायचं का, संतप्त मतदारांचा सवाल - Lok Sabha Election 2024
  2. लोकशाहीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी मुंबईत 'तारे जमीन पर'; कोणत्या सेलिब्रिटींनी केलं मतदान? वाचा संपूर्ण यादी - Lok Sabha Election 2024
  3. जान्हवी, फरहान, राजकुमार रावसह बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details