महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प आता MMRDA करणार, महा मेट्रो ऐवजी MMRDA कडं जबाबदारी - internal metro project in Thane - INTERNAL METRO PROJECT IN THANE

Thane Metro Project : ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्पाची जबाबदारी MMRDA कडं सोपवण्यात आली आहे. त्यामुळं महा मेट्रोच्या ऐवजी आता हे काम MMRDA करणार असून या वर्ष अखेरपर्यंत प्रकल्पाच्या कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Thane Metro Project
ठाणे मेट्रो प्रकल्प (source : MMRDA Website)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 10:54 PM IST

मुंबईThane Metro Project :मुंबई शहरापाठोपाठ ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळं ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली आहे. येत्या काही वर्षात ठाणे शहराची लोकसंख्या 27 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात पर्यायी वाहतुकीसाठी सातत्यानं नवनवीन पर्याय शोधले जात आहेत. सुरुवातीला वर्तुळाकार मेट्रो नंतर एलआरटीच्या पर्यायाच्या विचार करण्यात आला. मात्र, पुन्हा एकदा शहरात अंतर्गत मेट्रो करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला. वास्तविक अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प तुलनेनं खर्चिक असल्यानं केंद्र सरकारनं एलआरटी प्रकल्पाला पसंती दिली होती. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेनं अंतर्गत मेट्रो प्रकल्पालाच अधिक पसंती दिली. त्यानुसार डीपीआर तयार करून राज्य शासनाकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता.

महा मेट्रो ऐवजी MMRDA कडं जबाबदारी :ठाणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी यासंदर्भात एक बैठक घेऊन कारवाई सुरू केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प एमएमआरडीएकडं सोपवण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात याबाबत फारशी हालचाल झाली नाही. आता पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकल्पाकडं विशेष लक्ष दिलं असून त्यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आहे.

केंद्राकडून प्रस्ताव तयार :केंद्र सरकारनं या प्रकल्पाबाबत आता सकारात्मक प्रस्ताव तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या शंभर कामांमध्ये ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला स्थान दिलं आहे. त्यामुळं या वर्षाच्या अखेरपर्यंत या प्रकल्पाला आता मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचं सौरभ राव यांनी म्हटलं आहे.

कसा असणार प्रकल्प? : ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोचं काम आता एमएमआरडीए करणार असून हा मार्ग 29 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर तीन किलोमीटरपर्यंत भुयारी मार्ग असणार आहे. मेट्रोच्या या मार्गावर तेरा स्थानकं, प्रस्तावित करण्यात आली आहेत. नवीन विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकापासून या वर्तुळाकार मेट्रोची सुरुवात होणार आहे. या मेट्रो मार्गावर वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाई नगर, गांधीनगर, मानपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, आझाद नगर, मनोरमानगर, कोलशेत, बाळकुम, राबोडी, ठाणे रेल्वे स्थानक, असे मार्ग असणार आहे. या मार्गावरील दोन रेल्वे स्थानकं भुयारी असणार आहेत. मुंबईहून ठाण्याकडx येणाऱ्या मेट्रो 'चार'चं काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ठाणे ते मुख्य मेट्रो 4 ला जोडणाऱ्या या नवीन मार्गाचं काम सुरू होईल, अशी माहिती राव यांनी दिलीय.

'हे' वाचलंत का :

  1. "दाढीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम करणार"; विधानसभेसाठी भाजपा आमदाराला सख्ख्या भावाचं आव्हान - Shekhar Gore Vs Jaykumar Gore
  2. "दाढीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम करणार"; विधानसभेसाठी भाजपा आमदाराला सख्ख्या भावाचं आव्हान - Shekhar Gore Vs Jaykumar Gore
  3. पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीची अखेर बालसुधारगृहातून सुटका, मुंबई हायकोर्टाने दिले होते आदेश - Pune Porsche Accident Case

ABOUT THE AUTHOR

...view details