रायगडJitendra Awhad Burnt Manusmriti :महाड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली मनुस्मृतीला विरोध करत, त्यातील विचारसरणीला विरोध दर्शवत मनुस्मृतीचे दहन केले होते. त्याच ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृतीचं दहन करण्यापूर्वी जितेंंद्र आव्हाड यांनी टिपणीसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मनुस्मृतीतील काही भागांचं वाचनही आव्हाडांनी करून दाखवलं. जर मनुस्मृतीतील दोन श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असतील तर हळूहळू मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणार नाही का? असा सवालही आव्हाड यांनी विचारला.
आमदार जितेंद्र आव्हाड महाडमध्ये चवदार तलावाचे पाणी पिताना (ETV Bharat Reporter) आव्हाडांनी चवदार तलावाचे पाणी प्यायले :कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी चवदार तळ्यावर जात आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. तसंच ओंजळीने चवदार तळ्याचं पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह मनुस्मृतीचं दहन केलं. यावेळी त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच 'जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आव्हाड यांच्यासोबत मिलिंद टिपणीस आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मनूने दलित आणि स्त्रियांबाबत चुकीचे लिखाण केले. देशाला 5 हजार वर्षे मागे नेण्याचे काम काही नागरिक करत आहे. - आ. जितेंद्र आव्हाड
सरकारला याची गरज वाटली नाही का -मिलिंद टिपणीस यांनी आपल्या मनोगतमध्ये इतिहास सांगत मनू कोण होता? असा प्रश्न उपस्थित करत पाठ्यपुस्तकात मनुस्मृती दाखविणे, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणे हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा प्रश्न विचारला. अस्पृश्य समाजाला हीन वागणूक मिळाल्याने बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. पुढाऱ्यांना देशातला सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे. सरकारला अभ्यासक्रमात संतांच्या अभंगांचा समावेश का करावासा वाटला नाही. तथागत गौतम बुद्ध हे सर्वांत मोठे आहेत. त्यांच्याही विचारांचा समावेश होणे गरेजेचे होते. बहुजन तरुणांनी या बाबतीत विचार करणे गरजेचे, असं मिलिंद टिपणीस म्हणाले.
हेही वाचा:
- पुणे हिट अॅंड रन प्रकरण : डॉ अजय तावरे आणि डॉ हाळनोर यांच्या जीवाला धोका; सुषमा अंधारेंचा दावा - pune hit and run case
- पेन्शनसाठी हयातीचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा तहसील कार्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Old Woman Dies Case Miraj
- 'मला मृत्यूचा व्यापारी, घाणेरड्या नाल्यातला किडा...; पंतप्रधान मोदी विरोधकांवर संतापले! - Lok Sabha Election 2024