ठाणे Mira Bhayandar Metro Controversy :मीरा-भाईंदर शहरातील मेट्रोच्या रखडलेल्या कामाच्या मुद्द्यावरून आजी आणि माजी आमदार यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'सेव्हन इलेव्हन' कंपनीवर स्थानिक अपक्ष आमदार गीता जैन यांनी गंभीर आरोप केलाय. मेट्रोचं प्रस्तावित काशीगाव स्थानक उभारण्यात येत आहे, ती जागा हस्तांतरित करत नसल्यानं मेट्रोचं काम रखडलंय. गेल्या 22 महिन्यांपासून काशीगाव स्थानकाचं काम थांबलंय. त्यामुळं प्रत्येक महिन्याला 3 कोटी रुपये भुर्दंड लागत असल्याचा आरोप आमदार गीता जैन यांनी केलाय.
राजकीय दबावामुळं हे काम रखडलं : मीरा भाईंदर शहरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून स्थानिक अपक्ष आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता मेट्रोच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. "माजी आमदार मेहता यांच्या 'सेव्हन इलेव्हन' कंपनीच्या मालकीची जमीन 'एमएमआरडीए'कडं हस्तांतरित न झाल्यामुळं मेट्रोचं काम रखडलं आहे. स्थानिक नेते मेहता हे एवढ्या मोठ्या प्रकल्पात अडथळा आणण्याचं काम का करत आहेत?" असा सवाल आमदार गीता जैन यांनी केला. "'एमएमआरडीए'चे अधिकारी संजय मुखर्जी यांची भेट घेऊन सदर जागेचं भूसंपादन करून 15 दिवसांत जागा ताब्यात घेण्याची विनंती केली," असं गीता जैन यांनी सांगितलं. माजी आमदाराच्या राजकीय दबावामुळं हे काम रखडलं असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आजी-माजी आमदार आरोप-प्रत्युत्तर (Source - ETV Bharat Reporter) मोबदला द्या, एक मिनिटात जागा देतो : गीता जैन यांच्या आरोपानंतर माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा केलाय. "सदर जागा ताब्यात घेण्यात यावी आणि त्याबदल्यात शासनानं संपूर्ण मोबदला द्यावा, अशी विनंती मी महापालिका आयुक्तांना वारंवार पत्रं लिहून केली. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. यापूर्वीही शहरातील अनेक विकास प्रकल्पांसाठी सेव्हन इलेव्हन कंपनीकडून अनेक जागा पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या. मात्र, त्याचा मोबदला अद्यापही मिळाला नाही," असं नरेंद्र मेहता यांनी सांगितलं. "मी जागा देण्यास तयार आहे, महापालिका प्रशासनानं पैसे देऊन जागा घ्यावी," असंही ते म्हणाले.
गीता जैन फक्त बडबड करतात : गीता जैनआमदार गीता जैन या वारंवार नागरिकांची दिशाभूल करत आहेत. जैन यांना कोणत्याही प्रकारच्या कायद्याचं ज्ञान नाही. त्यामुळं त्या फक्त बडबड करत असतात. ज्या जागेसंदर्भात जैन यांनी माझ्यावर आरोप केले, ती जागा हस्तांतरित होऊ नये, मेट्रोचं काम रखडलं पाहिजे, यासाठी जैन यांचा पालिका आयुक्त संजय काटकर यांच्यावरती दबाव असल्याचा आरोपही मेहता यांनी केला.
हेही वाचा
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आमदारांसाठी उघडली 'तिजोरी' - Mahayuti Approved Funds MLA
- "रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ..."; तांदूळ दाखवत प्रणिती शिंदेंचा सरकारवर आरोप - Praniti Shinde On Plastic Rise
- 7 वर्षांनंतर लोणावळ्यात फुललेली कारवीची फुले पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी - Lonavala Karvi Flowers