महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात अल्पवयीन मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार; वसतीगृह प्रमुखासह चार जणांवर गुन्हा दाखल - Chandrapur Crime News - CHANDRAPUR CRIME NEWS

Chandrapur Crime News : चंद्रपूर शहरातील एका शाळेच्या वसतीगृहात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Chandrapur Crime News
मूकबधिर मुलींवर लैंगिक अत्याचार

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 10:54 PM IST

Updated : Apr 28, 2024, 6:27 AM IST

चंद्रपूर Chandrapur Crime News : चंद्रपुरातील एका शाळेत संतापजनक प्रकार घडला. शाळेच्या वसतीगृहात एका मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय. विद्यार्थिनी वस्तीगृहात एकांतात असल्याचं दिसताच वसतीगृह प्रमुखांनी जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न : वसतीगृह प्रमुखानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित विद्यार्थिनीनं शिक्षिकेला सांगितलं. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर येताच, शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. मात्र, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीय तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेत २५ एप्रिलला लेखी तक्रार दिली.

पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन यांनी सदरील प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान, आरोपींवर अट्रॉसिटी कायद्यातील कलम तीन, बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम १७, कलम २१, कलम ९ (फ), कलम ८ व कलम ९ (क), कलम ३५४, कलम ३५४-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

प्रकरणाचा तपास सुरू : अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर चंद्रपुरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime News: नूडल्सचे आमिष दाखवून केले तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; 42 वर्षीय शेजाऱ्याला अटक
  2. Mumbai news: मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकाला पाच वर्षाची शिक्षा-मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
  3. Girl Physical Abuse Case : शिक्षकाचा 7 चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार, न्यायालयाने नराधमाला ठोठावली पोलीस कोठडी
Last Updated : Apr 28, 2024, 6:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details