महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा, तुझं करिअर बनवेन' म्हणत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; निवासी शाळेच्या संचालकाला अटक - अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Girl Sexual Abuse : पिंपरी चिंचवडमध्ये एका निवासी शाळेच्या संचालकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संचालकाला अटक केली.

Girl Sexual Abuse
Girl Sexual Abuse

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 12:23 PM IST

Updated : Feb 4, 2024, 1:16 PM IST

वनिता धुमाळ, पोलीस निरीक्षक

पिंपरी चिंचवड Girl Sexual Abuse : पिंपरी-चिंचवड शहरातील एका निवासी शाळेच्या 59 वर्षीय संचालकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बाब कुणालाही सांगितली तरी मी तुझी बदनामी करेन, अशी धमकी या संचालकानं मुलीला दिली होती. या प्रकरणी संचालकासह त्याला मदत करणाऱ्या अन्य आरोपीला अटक करण्यात आलीय.

याआधीही असं कृत्य केलं होतं : या संचालकाविरोधात विद्यार्थिनीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीनं दहा वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारचं कृत्य केलं होतं. त्यानंतर त्याला अटकही झाली होती. आता तुरुंगातून सुटल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा असंच कृत्य केल्यानं पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

माजी विद्यार्थिनीची मदत :गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी संचालक आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक केली. आरोपी पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत भागात एक निवासी शाळा चालवतो. पीडित मुलीनं 2021 मध्ये या निवासी शाळेत प्रवेश घेतला होता. त्यासाठी तिनं 2 लाख 26 हजार रुपये भरले होते. पीडित मुलगी निवासी शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. तर आरोपी या हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावर राहत होता, अशी माहितीही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिली.

जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले :आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपीनं 2022 मध्ये पीडित मुलीला बोलावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीनं प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. त्यानं मुलीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यासाठी एक माजी विद्यार्थिनी तिच्यावर दबाव आणत होती. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत."

'माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा, मी तुझं करिअर घडवेन' अशी फूस लावून मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या निवासी शाळेतील माजी विद्यार्थिनीने या प्रकरणात आरोपीला मदत करत होती. त्यामुळं तिलाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास केला जात आहे - वनिता धुमाळ, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड

पालकांमध्ये भीतीचं वातावरण : निवासी शाळेतील अल्पवयीन मुलीवर संचालकानंच अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं परिसरातील पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

हे वाचलंत का :

  1. लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; भाजपाच्या माजी नगरसेवकावर बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा
  2. सोशल मीडियावर ओळख: तरुणासोबत नाईट आऊटला गेलेल्या तरुणीवर नराधमाचा अत्याचार, पोस्ट शेअर करुन मागितला न्याय
  3. तीन अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर महाराजाकडून लैंगिक अत्याचार, भोंदू महाराजावर पोस्को
Last Updated : Feb 4, 2024, 1:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details