सातारा Minor Girl Commits Suicide :साताऱ्यात पोक्सो गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन महिने कारागृहात असलेल्या नराधमानं जामीनावर सुटल्यानंतर अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करुन कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीनं गोंदवले (ता. माण) येथील राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवलं, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला. या घटनेनंतर साताऱ्यात नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्यानं संशयित तस्लिम मोहम्मद खान (रा. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तरुणाच्या जाचाला कंटाळून संपवलं जीवन : पूर्वी साताऱ्यात राहणारी तरुणी काही दिवसांपूर्वी कुटुंबांसह गोंदवले (ता. माण) परिसरात वास्तव्यास गेली होती. साताऱ्यातील तरुण तस्लिम खान हा तिला वारंवार त्रास देत होता. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात तीन महिने तो कारागृहात होता. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा त्यानं मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. फोन करुन तो मुलीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं शनिवारी (24 ऑगस्ट) दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली.