महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, पीडित कुटुंबाला 10 लाख देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Worli hit and run case

Mihir Shah in police custody : वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणात आरोपी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत देण्याचं जाहीर केलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 5:47 PM IST

Updated : Jul 10, 2024, 6:54 PM IST

मुंबईMihir Shah in police custody :वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं त्यांला 16 जुलैप्रर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

आरोपी मिहिर शाहला न्यायालयात हजर करताना पोलीस (ETV BHARAT Reporter)

पोलिसांनी युक्तिवादात काय म्हटलं :मिहिरला सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. या प्रकरणात मिहिरला ज्यांनी मदत केली त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. आरोपींकडं ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? याचा तपास करायचा असल्याचंही पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.

काय म्हणाले आरोपीचे वकील? :यावर मिहीरच्या वकिलानं सांगितलं की, कार चालक तसंच मिहिर यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. त्याचा फोनही पोलिसांनी जप्त केला आहे. मग आता त्यांना मिहिरची कस्टडी कशाला हवी आहे? आरोपीलाही घटनास्थळी नेण्यात आलय. त्यानं संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. ड्रायव्हर आणि मिहिरचं उत्तर जुळलंय. त्यामुळं मिहिरला ताब्यात घेण्याचं पोलिसांकडं सबळ कारण नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी मिहिरला 16 जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पीडित कुटुंबाला 10 लाख देणार : या प्रकणात आज आरोपीचे वडील राजेश शाह यांची शिवसेना (शिंदे गट) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकणात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. आज त्यांनी कोस्टल रोडची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. पुढं बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, वरळी हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हे खूप गंभीर आहे. त्या पीडित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जे अनधिकृत कामं करतील, त्यांना सरकार सोडणार नाही, सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. तसंच पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपयांची मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

विरोधकांना दुसरं काम नाही : या प्रकरणात आता आरोपी मिहिर शाहचे वडील राजेश शाह यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. या प्रकणात विरोधकांना आरोप करण्याशिवाय कुठलंही दुसरं काम नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. टीका करणं, आरोप करणं एवढंच विरोधकांकडं काम आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.

'हे' वाचलंत का :

  1. वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय - Rajesh Shah in worli hit run case
  2. वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक संबंध, संजय राऊतांचा गंभीर आरोप - worli hit and run case
  3. अपघातापूर्वी मिहिर शाह गेलेल्या बारवर बीएमसीची कारवाई, अनधिकृत बांधकाम पाडलं - Worli Hit And Run Case
Last Updated : Jul 10, 2024, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details