आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग ठाणे Mira Bhayandar Fire News : भाईंदरच्या आझाद नगर परिसरात आगीच्या घटनेत एका रहिवाशाचा मृत्यू झाला आहे. दीपक चौरसिया उर्फ पप्पू पानवाला असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आग विझवत असताना चार अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. तर तीन रहिवासी या आगीत होरपळले आहेत.
भंगाराच्या गोदामाला आग : भाईंदर आझाद नगर परिसरातील पहाटे पाचच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळं आग लागली. यात भंगाराच्या गोदामासह पन्नासहुन अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. यात अग्निशमन दलाचे चार जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
अनेकांची घरं जळून खाक: या लागलेल्या आगीत अनेकांची घरं जळून खाक झाले आहेत. आग लागल्याचं कळताच येथील अनेक नागरिकांनी हाताला मिळेल ते सामान घेऊन परिसर सोडला. मीरा-भाईंदर परिसरात लागलेली आग अतिशय भीषण असून अनेक किलोमीटर अंतरावरुन धुराचे लोट पसरले होते. आगीतून बाहेर पडणारा काळा धूर परिसरात पसरला होता. आगीमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर परिसरातील नागरिकांनी जीव मुठीत घेऊन बाहेर धाव घेतली.
परिसरात भीतीचं वातावरण : घटनास्थळावर कुलिंगचं काम सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे. धुराचे लोड परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. आग मोठी असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आग विझवण्यासाठी वसई विरार, ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब देखील दाखल झाले होते.
हेही वाचा -
- अंबरनाथमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; ९ गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे अनेक झोपड्या जळून खाक
- पिंपरी चिंचवड शहरातील मोकळ्या जागेत भीषण आग: ऑइलच्या बॅरलमुळं स्फोट
- नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग