महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Accident News : साताऱ्यातील व्यावसायिकाच्या विवाहित मुलीचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू - Satara Accident News

Satara Accident News : साताऱ्यातील व्यावसायिकाच्या विवाहित मुलीचा अमेरिकेतील कार अपघातात जागीच मृत्यू झालाय. ऐश्‍वर्या देशमाने-भिवटे (वय २९), असं त्याचं नाव आहे. त्या आयटी इंजिनिअर होत्या. गुरुवारी (दि. १४) सकाळी त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार होणार आहे.

Accident News
भीषण अपघातात जागीच मृ

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 10:43 PM IST

साताराSatara Accident News : साताऱ्यातील व्यावसायिकाची विवाहित मुलगी ऐश्‍वर्या राजेंद्र देशमाने-भिवटे (वय २९) यांचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. त्या आयटी इंजिनिअर होत्या. कोल्हापुरातील उद्योजक भारत भिवटे यांचे सुपुत्र पार्थ यांच्याशी ऐश्‍वर्याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या घटनेमुळं सातारा आणि कोल्हापुरातील देशमाने-भिवटे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.



एप्रिलपासून नोकरीत रुजू होणार होत्या : सातारा येथील व्यावसायिक राजेंद्र देशमाने यांची मुलगी ऐश्वर्या हिचा तीन वर्षांपूर्वी कोल्हापुरातील उद्योजक भारत भिवटे यांचे सुपुत्र पार्थ भिवटे यांच्याशी विवाह झाला होता. अमेरिकेतील मिशिगन प्रांतातील डेट्राईट शहरात असलेल्या फोर्ड कंपनीत ते कार्यरत होते. पत्नी ऐश्‍वर्यासह ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. पत्नी ऐश्‍वर्याने देखील अमेरिकेत नोकरीसाठी आवश्‍यक असणारा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. एप्रिल महिन्यापासून त्या नोकरीमध्ये रुजू होणार होत्या.



खरेदीला गेल्यानंतर कारचा भीषण अपघात : साताऱ्यातील देशमाने कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई पार्थ आणि मुलगी ऐश्‍वर्या हे रात्री खरेदीसाठी बाहेर पडले होते. डेट्रॉईट शहरातील एका चौकातून डावीकडं वळत असताना उजव्या बाजूनं आलेल्या कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी मोठी होती की, चालकाच्या बाजूला बसलेल्या ऐश्‍वर्या यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती पार्थ हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.



पार्थिवावर गुरूवारी कोल्हापुरात अंत्यसंस्कार : ऐश्‍वर्या देशमाने-भिवटे यांचे पार्थिव बुधवारी रात्री साताऱ्यातील देशमाने यांच्या शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. १४) सकाळी सासरी कोल्हापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळं देशमाने आणि भिवटे परिवारावर शोककळा पसरली असून सातारा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा -

  1. कास पठारावर फिरायला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; कार दुभाजकाला धडकून दोघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
  2. लेगापाणी घाटात कोसळली पिकअप ; चौघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर
  3. अनियंत्रित एनएमएमटी बसनं मोटारसायकलस्वारांना चिरडलं, घटना सीसीटीव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details