अमरावती Marriage Ceremony Amravati : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रहिमापूर इथं दोन दिवसांपूर्वी पार पडलेला एक अनोखा विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आलाय. कारण, लग्नाच्या मंडपात 80 वर्षाच्या नवरदेवाचं आणि 65 वर्षाची नवरीसोबत थाटात लग्न लावून देण्यात आलंय. लग्न कोणी आणि कसं जमवलं, जाणून घ्या....
अनोख्या लग्नाची चर्चा जोरदार :अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रहिमापूर इथं दोन दिवसांपूर्वी पार पडलेला विवाह सोहळा जिल्ह्यात ट्रेंडिंगचा विषय बनलाय. या लग्नाच्या मंडपात चक्क 80 वर्षाचा नवरदेव आणि 65 वर्षाची नवरी हे या सोळ्याचं खास वैशिष्ट्य होतं. विशेष म्हणजे, नवरदेवानं काढलेल्या वरातीमध्ये नवरदेवासोबत चक्क त्याचा पन्नास वर्षाचा मुलगा देखील मस्त नाचत आनंदात सहभागी झाला होता. बापाच्या लग्नात चक्क लेकाचा झिंगाट डान्स यावेळी पाहायला मिळाला. त्यामुळं याची चर्चा तर होणारच ना भाऊ...बातमीचा खरा ट्विस्ट खाली वाचल्यावर कळेल...
अशी आहे या लग्नाची कहाणी : अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रहिमापूर येथील रहिवासी असणारे 80 वर्ष वयाचे विठ्ठल खंडारे यांच्या पत्नीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं. चार मुलं, मुली, नातवंड, नात सुना असा नातलगांचा भलामोठा गोतावळा विठ्ठल खंडारे यांच्या सभोवताल होता. मात्र, तरीही ऐन 80 वर्षातही विठ्ठल यांना पत्नीच्या विरहात एकटेपणा टोचत होता. आपल्याला लग्न करायचं, असा विचार त्यांनी आपल्या मुलांपुढं मांडला. सुरुवातीला मुलांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. मात्र, विठ्ठलराव खंडारे यांचा लग्नाचा हट्ट कायम असल्यामुळं मुलांनी देखील आपल्या वडिलांचं लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सुरू झाला नवरी बघण्याचा कार्यक्रम आणि ते कसं तर वाचा खाली...