महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"ईव्हीएम हटाव चळवळ सुरू ठेवून न्यायालयीन लढा देणं महत्त्वाचं"- शरद पवार - SHARAD PAWAR MARKADWADI VISIT

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार हे आज (8 डिसेंबर) मारकडवाडी दौऱ्यावर आहेत. यावेळी ग्रामस्थांच्या बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीवर ते चर्चा करणार आहेत.

markadwadi voting controversy, Sharad Pawar visit Markadwadi village today 8 december
शरद पवार मारकडवाडी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2024, 10:35 AM IST

Updated : Dec 8, 2024, 2:02 PM IST

सोलापूर :राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून (MVA) ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अशातच सोलापूरमधील माळशिरसमधील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. या घटनेनंतर आज (8 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार मारकडवाडीत आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "निवडणूक पद्धतीत बदल करणं गरजेच आहे. देशात सध्या मारकडवाडी गावाची चर्चा सुरू आहे. ईव्हीएम मतदानातील आकडेवारी ग्रामस्थांचा आक्षेप आहे. गावकऱ्यांना त्यांच्या गावात जमावबंदी लागू केली आहे. काही निकालांवर संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत बॅलट पेपवर मतदान होते. आपल्याकडं का नाही? म्हतारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतो. मारकडवाडीनं बदल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथे आम्हाला राजकारण आणायचे नाही. येथील लोकांच्या मनातील शंकानिरसन दूर करायचे आहे. निवडणूक आयोगाबाबत संशय दूर करायचा आहे. ग्रामस्थांनी बॅलट मतदानासाठी ठराव करावा, हा ठराव राज्य सरकारला पाठवावा".

शरद पवार मारकडवाडी गावात (ETV Bharat Reporter)

लोकांच्या शंकेचं निरसन करावे-"मुख्यमंत्र्यांनी मारकटवाडीत येऊन लोकांच्या शंकेचं निरसन करावे," असे आवाहन शरद पवार यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना आवाहन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे चुकीचे वागत आहे, असे म्हटलं होते. त्यावर शरद पवार म्हणाले, " लोकांना भेटणे चुकीचे आहे का? "मुख्यमंत्र्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधावा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे," असे शरद पवार यांनी म्हटले.

"ही चळवळ सुरू ठेवून गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं न्यायालयीन लढा ही देणं आवश्यक आहे. लढा देण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे. मतदारसंघातील संपूर्ण तालुक्यातून ईव्हीएम हटाव, पुढील निवडणुका या बॅलेट पेपरवरती घेण्यात यावे अशा पद्धतीचे ठराव करून ते ठराव आमदार जानकर यांच्याकडे द्यावेत. या आंदोलनाविषयी मी संसदेमध्येही आवाज उठवणार आहे," अशी ग्वाही खासदार पवार यांनी ग्रामस्थांना दिली. तसेच या आंदोलनाविषयी पंतप्रधान आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याबरोबर ही चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितलं.

उत्तम जानकर काय म्हणाले? : यावेळी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार उत्तम जानकर म्हणाले की, "लाडक्या बहिणींच्या दोन-चार हजार मतांचा परिणाम झाला नाही असं नाही, पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी राजीनामा देऊ शकतो. देशातील एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही? तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता, काश्मीरमध्ये निवडणूक घेता, तर मग एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय?", असा संतप्त सवालही जानकर यांनी केला.

बॅलेट पेपर निवडणुकीला प्रशासनाचा विरोध : मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं. यासाठी ग्रामस्थांकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली. तसंच जमावबंदीमध्ये मतदान झालं तर लोकांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. त्यामुळं अखेर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली.

  • संसदेमध्ये स्वत: शरद पवार मारकटवाडीतील मतदान आंदोलनाचा प्रश्न उपस्थिथ करणार असल्यानं सरकार काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा -

  1. "मारकडवाडी नव्या भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी मार्च"; जितेंद्र आव्हाडांचं विधान
  2. काँग्रेसनं घेतली ईव्हीएमविरोधात लढा देणाऱ्या मारकडवाडी गावातली माती; राहुल गांधींना पाठवणार
  3. "पोलिसांनी त्यांना लोकशाही हक्क वापरु द्यावा", मारकडवाडी प्रकरणावर असीम सरोदे यांची प्रतिक्रिया
Last Updated : Dec 8, 2024, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details