महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रेकिंग करणं बेतलं जीवावर; ठाण्यातील तरुणाचा हिमाचल प्रदेशात मृत्यू - मराठी पर्यटक कुल्लूमध्ये मृत्यू

Marathi Tourist Dies in Kullu : ठाणे येथून मित्रांबरोबर हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथं गेलेल्या एका पर्यटकाचा ट्रेकिंग करताना प्रकृती बिघडल्यानं मृत्यू झालाय. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतलाय. यशवंत तामणे असं मृत तरुणाचं नाव आहे.

मित्रांसह हिमाचल प्रदेशातील कुलू इथं ट्रेकींगसाठी गेलेल्या ठाण्यातील तरुणाचा मृत्यू
मित्रांसह हिमाचल प्रदेशातील कुलू इथं ट्रेकींगसाठी गेलेल्या ठाण्यातील तरुणाचा मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 10:54 AM IST

कुल्लू (हिमाचल प्रदेश) Marathi Tourist Dies in Kullu : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील टेकड्यांवर मित्रांबरोबर ट्रेकिंग करणाऱ्या एका तरुण पर्यटकाचा मृत्यू झालाय. हा तरुण महाराष्ट्रातील रहिवासी आहे. पाटलीकुहाळ पोलिसांच्या पथकानं याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केलाय.

तंबूत पडला बेशुद्ध : मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील हा तरुण आपल्या मित्रांसह हिमाचलमधील कुल्लू इथं ट्रेकिंगसाठी पोहोचला होता. यावेळी त्याचे मित्र तंबूच्या आत गेले असता, त्यांना तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्यानंतर मित्रांनी त्याला तातडीनं पाटलीकुहाळ रुग्णालयात उपचारासाठी नेलं. तिथं डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलंय. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतलाय.

तरुण ठाण्याचा रहिवासी : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत तामणे असं मृत तरुणाचं नाव असून तो ठाणे येथील रहिवासी आहे. महाराष्ट्रातील पाच पर्यटक ट्रेकिंगला गेले होते आणि रात्री पाटलीकुहाळ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या घन कुऱ्हाडी कॅम्पमध्ये थांबले होते. दरम्यान, यशवंतची प्रकृती खालावली आणि तो तंबूतच बेशुद्ध पडला. त्यानंतर मित्रांनी त्याला पाटलीकुहाळ रुग्णालयात उपचारासाठी नेलं. तिथं डॉक्टरांनी यशवंतला मृत घोषित केलं. दरम्यान या तरुणाचा मृत्यू कशानं झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

याप्रकरणी अधिक तपास सुरू : याप्रकरणी डीएसपी मनाली के. डी. शर्मा यांनी सांगितलं की, "पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी इतर पर्यटकांचे जबाबही नोंदवले आहेत. कुल्लू पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत."

हेही वाचा :

  1. हिमाचलमध्ये पसरली बर्फाची चादर; रोमँटिक वातावरणात पर्यटक करतायेत एन्जॉय, पाहा फोटो
  2. Cricket World Cup 2023 AUS vs NZ : विजयी घौडदौड कायम ठेवण्यासाठी 'दोन शेजारी' उतरणार मैदानात; कोण मारणार बाजी?
  3. Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगणा राजकारणाच्या मैदानात? 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे दिले संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details