मुंबई Maratha Reservation Issue: राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे काढले, आंदोलनं केली आणि आता पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. दरम्यान, शुक्रवारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, यासाठी लवकरच राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात येईल, असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं.
काय म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी? :मराठ्यांना जे आरक्षण दिलं आहे, ते सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तसेच फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित्य न राहता देशभर या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मराठा समाजातील सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी तरतूद सरकारनं केली पाहिजे. वेळ पडली तर घटनेत बदल करावा, पण आरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शुक्रवारी सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत, आरक्षणावर लवकरच तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं आहे.