पुणेAllegation of Laxman Mane : मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाच्या मागणीसाठीचा मोर्चा पुणेमार्गे पायी मुंबईकडे निघाला असताना लेखक लक्ष्मण माने यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (Maratha Reservation) लेखक लक्ष्मण माने म्हणाले, ''जरांगे म्हणाले की आम्हाला या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं. हे लोक म्हणजे कोण? आम्ही म्हणजे आम्ही राखीव जागेतले लोक आहोत. आमच्या हाताखाली काम करायची लाज वाटत असेल, तर तुम्ही आमच्या ताटात जेवायला बसायची गोष्ट कशाला करता? (Lakh Maratha) तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही मनुवादी आहात. संपूर्ण यात्रेमध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचं चित्र कुठे दिसतं का? बहुजन समाजाला मराठा समाजापासून तोडण्याचं हे आरएसएसचं, देवेंद्र फडणवीसांचं कारस्थान आहे, हे मी जाहीरपणे सांगतो. जरांगे यांच्या पाठीमागे फडणवीसांची ताकद आहे. मराठा समाज गरीब आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत. ते आरक्षण मागत आहेत. मग एवढा पैसा आंदोलनाला आला कुठून?'', असे प्रश्न लक्ष्मण माने यांनी उपस्थित केले आहेत.
तर हा पैसा येतो कुठून?जरांगे पाटील यांच्या 200, 400 एकरामध्ये सभा होतात. एवढा अफाट पैसा खर्च होतो. हे कसं शक्य आहे? एक तर तो समाज श्रीमंत असला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना राखीव जागा मागण्याचा हक्क नाही. तो समाज खरोखरच गरीब असेल आणि त्याला राखीव जागांची गरज असेल तर हा पैसा येतो कुठून? जेसीबीनं फुले उधळली जातात, हे सगळं कोणीतरी अर्थसाह्य केल्याशिवाय शक्य नाही, असा आरोपही लक्ष्मण माने यांनी केला.