महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान - Encounter in Gadchiroli - ENCOUNTER IN GADCHIROLI

Encounter between Gadchiroli Police and Maoists : गडचिरोलीत दुपारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला असून, यात 12 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Encounter between Gadchiroli Police and Maoists
12 माओवाद्यांना कंठस्नान (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 8:42 PM IST

Updated : Jul 17, 2024, 9:47 PM IST

गडचिरोली Encounter between Gadchiroli Police and Maoists : गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रात येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजेताच्या सुमारास गडचिरोली पोलीस-नक्षल्यांत चकमक झाली. यात 12 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं. तर यात एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच घनदाट जंगलात हा थरार घडला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती देताना (ETV Bharat Reporter)

सकाळी सुरु झालं ऑपरेशन : इंटला गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सकाळी 10 वाजता गडचिरोली इथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आलं. ज्यात C60 दल वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ पाठवण्यात आलं. यात आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 7 ऑटोमोटिव्ह शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. मृत झालेल्या 12 नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. यात टिपागड (ता. कोरची) दलमच्या विभागीय समितीचा सदस्य लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम यांचा समावेश आहे. तर उर्वरित दहा जणांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

51 लाखांचं बक्षीस जाहीर : यात C60 चा एक PSI आणि एक जवान जखमी झाला आहे. ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या ऑपरेशनसाठी कामगिरी केलेल्या यशस्वी C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे.

हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं : अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Devendra Fadnavis
  2. गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश - Naxalite Encounter Gadchiroli
  3. Naxal Police Encounter in Gadchiroli: गडचिरोलीच्या जंगलात नक्षल-पोलीस चकमक; इनामी नक्षलवादी ठार
Last Updated : Jul 17, 2024, 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details