मुंबई Sushiben Shah On Grand Alliance :राज्यात आणि संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या 4 जूनला देशभरात आणि राज्यात नेमका कोणाला जनतेचा कौल मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी याबाबत केलेले वक्तव्य अत्यंत खळबळजनक आहे.
सुशीबेन शाह या योगेंद्र यादव यांच्यावर टीका करताना (ETV Bharat Reporter) एनडीएला 20 जागांचा तोटा :या संदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव म्हणाले होते की, महाराष्ट्रातील निवडणूक ही शिवसेना खरी कोणाची किंवा राष्ट्रवादी खरी कोणाची या मुद्द्यांवरच झाली आणि यावेळी जनतेने शिवसेना आणि राष्ट्रवादी खरी कोणाची हे दाखवून दिले आहे. त्यामुळे एनडीएला गेल्या निवडणुकीत 42 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत एनडीएला केवळ 22 जागा मिळतील आणि 20 जागांचा तोटा होईल, असे यादव म्हणाले. तर या निवडणुकीत भाजपाचे पाच जागांची नुकसान होणार असून अन्य पक्षांचे 15 जागांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अवस्था वाईट होईल, असे विधान त्यांनी केले.
शिंदे, पवार, फडणवीस मजबूतच :योगेंद्र यादव यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना बालहक्क आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या की, योगेंद्र यादव यांनी आधी हे स्पष्ट करावं की ते राजकीय विश्लेषक आहेत की इंडिया आघाडीचे प्रवक्ते आहेत. त्यांचे वक्तव्य हे अत्यंत हास्यास्पद असून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहेत. तर अत्यंत अभ्यासू आणि प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जात आहे. तसेच अजित पवार आणि या दोन नेत्यांनी मिळून महाराष्ट्राला एक अद्भुत असे शासन पर्व दिले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीच्या 45 पेक्षा अधिक जागा निश्चितच जिंकून येणार आहे आणि येत्या 4 जूनला मोदी सरकारच देशात प्रस्थापित होईल. त्यामुळे यादवांच्या या वक्तव्याला काहीही अर्थ नाही असेही शाह म्हणाल्या.
हेही वाचा:
- लग्नाचे आमिष दाखवून मावस बहिणीवर बलात्कार; तब्बल आठ वर्षानंतर मिळाला न्याय, भावाला १० वर्षांची शिक्षा - Sister Rape Case
- राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
- पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर परिसरात सापडलं तळघर सदृष्य भुयार? पुरातन मूर्तीही सापडल्या, तज्ञांच्या उपस्थितीत होणार पाहणी - subway found under Vitthal Temple