महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विखे पाटलांना पक्षातूनच आव्हान देणारे भाजपा नेते आज थोरातांचा व्यासपीठावर... - Rajendra Pipada - RAJENDRA PIPADA

Rajendra Pipada - भाजपा नेते राजेंद्र पिपाडा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे एका व्यासपीठावर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. भाजापाला सोडचिट्टी देत ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार काय याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Rajendra Pipada
भाजपा नेते राजेंद्र पिपाडा आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात एकत्र (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 3:39 PM IST

शिर्डी Rajendra Pipada: जिल्ह्यातील दोन्ही महाविकास आघाडीच्या खासदारांच्या नागरी सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राजेंद्र पिपाडा एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यामुळे ते भाजपाची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का? तसंच विखे यांच्या विरोधात पिपाडा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार का? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

भाजपा नेते राजेंद्र पिपाडा यांनी कालच अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडं शिर्डी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागणार असल्याचं जाहीर करत थेट विखे पाटलांनाच आव्हान दिलं होतं. भाजपाकडून शिर्डी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागणारे पिपाडा आज मात्र, अचानक काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

12 हजार मतांनी पिपाडा यांचा पराभव : राजेंद्र पिपाडा यांनी 2009 साली शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, 12 हजार मतांनी पिपाडा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पिपाडा यांनी विखे पाटलांच्या बरोबर जात भाजपात प्रवेश केला होता. मात्र, काल पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका करत भाजपा पक्ष श्रेष्ठींकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणार असल्याचं व्यक्तव्य केलं. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या प्रतिभावती घोगरे गेल्या अनेक दिवसांपासून विखे पाटलांच्या विरोधात मैदानात उतरल्यात. त्या महाविकास आघाडीकडून शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आज भाजपाचे राजेंद्र पिपाडा थोरातांच्या व्यासपीठावर आल्यानं महाविकास आघाडी शिर्डीतून कोणाला उमेदवारी देते आणि कोण विखे पाटलांच्या विरोधात लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा

  1. विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज केली जातंय का? सत्ताधारी-विरोधी पक्षांचे 'हे' आहेत दावे - Maharashtra Politics
  2. सुजय विखे पाटील यांनी खेळली आजोबांसारखी खेळी, अहमदनगरमध्ये 1991 ची होणार का पुनरावृत्ती ? जाणून घ्या काय आहे 'हा' कायदा ? - Sujay Vikhe Filed Petition

ABOUT THE AUTHOR

...view details