नागपूर : येत्या 16 डिसेंबरपासून राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. हे अधिवेशन केवळ एक आठवड्याचं असंल, तरी अनेक अर्थांनी खास असणार आहे. महाराष्ट्रातील पहिलं डिजिटल विधिमंडळ अधिवेशन नागपुरात होणार आहे. विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील प्रत्येक आमदारांच्या आसनासमोर एक डिजिटल स्क्रीन बसवण्यात आली आहे. त्यामुळं आता आमदारांना सभागृहात डिजीटल पध्दतीनं कामकाज करता येणार आहे.
डिजिटल पध्दतीनं होणारं पहिलं अधिवेशन : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे अखेर मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. नव्या सरकारचं विधिमंडळाचं पहिलंचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. साधारणत: एक आठवड्याचं कामकाज निश्चित झालं असून, या अधिवेशनाचं कामकाज डिजिटल पध्दतीनं केलं जाणार आहे. आमदारांच्या आसनासमोर असलेल्या टेबलवर लॅपटॉप बसवण्यात आले आहेत. अधिवेशनाबाबतच्या कामकाजासंदर्भातील सर्व माहिती यात दिसणार आहे. डिजिटल पध्दतीनं होणारं महाराष्ट्रातील हे पहिलं अधिवेशन असणार आहे.
हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात (Source - ETV Bharat Reporter) यंदापासून पेपरलेस काम :यावर्षी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पेपरलेस करण्यासाठी युध्दपातळीवर यंत्रणाही काम करत आहे. दोन्ही सभागृहात आमदारांच्या बैठकीसाठी नवी व्यवस्था करण्यात आली आहे. आमदारांच्या टेबलवर लॅपटॉप बसवण्यात आले आहेत. त्यामुळं यंदापासून पेपरलेस काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सभागृहात प्रत्येक आमदाराच्या टेबलवर असणार लॅपटॉप (Source -ETV Bharat) विदर्भातील प्रश्नांना प्राध्यान देण्यासाठी अधिवेशन पण... : ज्यावेळी विदर्भ अखंड महाराष्ट्रात सामील झाला, त्यावेळी विदर्भातील प्रश्नांना प्राध्यान देण्यासाठी राज्य सरकार किमान एक महिना नागपुरात येईल आणि इथल्या प्रश्नांना प्राधान्यांने सोडवेल, अशी अट नागपूर करारात ठेवण्यात आली होती. त्यानुसार दरवर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित केलं जातं. मात्र, ज्या उद्देशासाठी हा घाट घातला जातो, तो उद्देश अजूनही अपूर्ण आहे. सरकार फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नागपूरला अधिवेशन आयोजित करतं, असा आरोप विदर्भातील जनतेकडून केला जात आहे.
हेही वाचा
- महाविकास आघाडीला धक्का; अबू आझमी मविआमधून बाहेर? विरोधकांना न जुमानता घेतली शपथ
- "मारकडवाडी नव्या भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी मार्च"; जितेंद्र आव्हाडांचं विधान
- महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांचा आजच्या शपथविधीवर बहिष्कार