महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्या दुपारी 1 वाजता लागणार एचएससी बोर्डाचा बारावीचा निकाल, वाचा कुठे पाहू शकता ऑनलाईन रिझल्ट... - HSC board 12th result - HSC BOARD 12TH RESULT

Enter here.. HSC board 12th result बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. उद्या दि. २१ मे रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डानं ही माहिती दिली आहे.

बारावीचा निकाल
बारावीचा निकाल (file photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 1:57 PM IST

Updated : May 20, 2024, 2:43 PM IST

पुणे HSC board 12th result: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली असून उद्या एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या मंगळवारी जाहीर होणार आहे. राज्य मंडळातर्फे याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा संपून सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला.त्यामुळे निकाल केव्हा लागणार? याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यावर दहावी व बारावीचे निकाल मे महिन्यातच जाहीर केले जातील. असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले होते. त्यानुसार निकालाची तारख जाहीर झाली आहे.

या लिंकवर ऑनलाईन निकाल पाहता येईल
१. https://mahresult.nic.in/
२. https://results.digilocker.gov.in/
३. https://www.mahahsscboard.in/mr

Last Updated : May 20, 2024, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details