महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ॲक्शन मोडवर, ससूनमधील 'त्या' दोन्ही डॉक्टरांवर कारवाई - डॉ. विंकी रुघवानी - Pune hit and run case - PUNE HIT AND RUN CASE

Pune hit and run case : पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळणोर या दोघांना नोटीस बजावून सात दिवसांत लेखी उत्तर मागितलं आहे. दोन्ही डॉक्टरांनी केलेलं कृत्य योग्य नसून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईलं, असं महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे विद्यमान प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी म्हटलं आहे.

Pune hit and run case
डॉ. विंकी रुघवानी (Reporter ETV Bharat MH)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 10:47 PM IST

डॉ. विंकी रुघवानी यांची प्रतिक्रिया (Reporter ETV Bharat MH)

नागपूर :पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचं नमुने बदलून त्याला मदत करणाऱ्या दोन डॉक्टरांवर आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं कारवाई सुरू केली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळणोर यांना नोटीस बजावून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं सात दिवसांत लेखी उत्तर मागितलं आहे. आरोपीच्या रक्तांचे नमुने बदलविणाऱ्या दोन्ही डॉक्टरांची कृती डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी असल्याचं मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे विद्यमान प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी व्यक्त केलं आहे.

मेडिकल सुमोटिव्ही कौन्सिल कारवाई करणार :ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्या संदर्भात चुकीची कृती केली आहे. याबाबतचे पुरावे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तपासणार असून त्यानंतर दोन्ही डॉक्टरांविरोधात कारवाई केली जाईल, असंही डॉ. रुघवानी यांनी म्हटलं आहे. प्रसार माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर स्वतःहून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं या प्रकरणात कारवाई सुरू केली असल्याची माहिती डॉ. रुघवानी यांनी दिली.

पोलीस हिट अँड रण प्रकरणाच्या मुळाशी जातील : पुणे हिट अँड रण प्रकरणाचा पोलिसांनी अतिशय सखोल तपास केलेला आहे. त्यामुळंच या प्रकरणातील गडबड समोर आली. पोलीस विभागानं आरोपींचे सीडीआर काढलंय. त्यातूनच या गडबड झाल्याचं समोर आलंय. पोलिसांनी योग्य तपास करत या प्रकरणाचे धागेदोऱ्यांचा शोधून मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं आरोपीच्या रक्ताचे नमुने बदल्याचं लक्षात आलं. परंतु दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळं लगेच बाब उघड झाली. यामध्ये जे डॉक्टर सहभागी होते, त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पूर्ण मुळाशी पोलीस विभाग गेल्याशिवाय थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का :

  1. पुणे हिट अँड रन प्रकरण; विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी - Pune Hit And Run Case
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणी तीन सदस्यीय समिती ससूनमध्ये दाखल - Pune Hit And Run Case Updates
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी - Pune Hit And Run Case

ABOUT THE AUTHOR

...view details