नागपूर DCM Devendra Fadnvis : महाराष्ट्र दिनानिमित्तानं नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडला. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिन राज्यभर साजरा होत असून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयस्थळी आज सकाळी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन :ध्वजारोहणानंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्रानं मोठी प्रगती केलेली आहे. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. भविष्यात देखील सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करत महाराष्ट्र पुढं जात राहील," असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
मतदान करणाऱ्यांना मत मांडण्याचा अधिकार : केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेली आकडेवारी बघितल्यानंतर मतदान कमी होतंय, असं वाटत नसल्याचं फडणवीस म्हणाले. "मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार हा नैतिकदृष्ट्या त्यांनाच आहे, जे मतदान करतात आणि म्हणून आपलं मत मांडायचं असेल, तर मतदान केलं पाहिजे," असंही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण : आज महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण राज्यात उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलंय. तर पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलंय.
महाराष्ट्र दिन; महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन, देशाच्या प्रगतीत आहे मोठा वाटा : देवेंद्र फडणवीस - maharashtra day - MAHARASHTRA DAY
DCM Devendra Fadnvis : नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, असं स्पष्ट केलं.
"महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन" - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published : May 1, 2024, 2:21 PM IST
हेही वाचा :
- महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन एकाच दिवशी साजरा होण्याचा ऐतिहासिक योगायोग - LABOR DAY 2024
- महाराष्ट्र दिन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली, म्हणाले 'महाराष्ट्रानं देशाला दिशा अन् विचार दिला' - Maharashtra Foundation Day
- बेळगांव, कारवार, बिदरसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अजूनही अपूर्ण - उपमुख्यमंत्री अजित पवार - Maharashtra Day