महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी - maharashtra hsc result 2024 - MAHARASHTRA HSC RESULT 2024

Maharashtra HSC Result 2024 : महाराष्ट्रातील एचएससी बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचं चित्र बघायला मिळतंय.

maharashtra hsc result 2024 declared 12 th class result announced today 21st may 2024
बारावीचा निकाल जाहीर (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 11:29 AM IST

Updated : May 21, 2024, 3:54 PM IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (reporter)

मुंबई Maharashtra HSC Result 2024 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झालाय. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

यंदा राज्यात बारावीचा निकाल 93.37 टक्के लागलाय. तर यावेळीही निकालात कोकण विभागानं बाजी मारलीय. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे, तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग शेवटचा आलाय. तसंच यावेळी देखील बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एका विद्यार्थिनीला 100 टक्के प्राप्त झाले आहेत.


निकालाची ठळक वैशिष्ट्ये :

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी 93.37 आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 45,447 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 45,083 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 22,463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 49.82 आहे.

खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 41,362 एवढी असून त्यापैकी 40,795 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 34,988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 85.76 आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7032 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6986 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसंच त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 94.20 आहे.

इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीनं सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.51%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (91.95%) आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल 95.44 % असून मुलांचा निकाल 91.60% आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84% ने जास्त आहे.

एकूण 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100% आहे.

नऊ विभागाची माहिती घेतली असता पुणे 94.44 टक्के,नागपूर 92.12 टक्के,छत्रपती संभाजी नगर 94.08 टक्के,मुंबई 91.95 (सर्वात कमी),कोल्हापूर 94.24 टक्के,अमरावती 93 टक्के,नाशिक 94.71 टक्के,लातूर 92.36 कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त) निकाल लागलाय.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

या लिंकवर ऑनलाईन निकाल पाहता येईल
१. https://mahresult.nic.in/
२. https://results.digilocker.gov.in/
३. https://www.mahahsscboard.in/mr

हेही वाचा -

  1. बारावीच्या परीक्षेचा आज निकाल; कसा आणि कुठे पाहाल? - Maharashtra HSC 12th Result 2024
  2. उद्या दुपारी 1 वाजता लागणार एचएससी बोर्डाचा बारावीचा निकाल, वाचा कुठे पाहू शकता ऑनलाईन रिझल्ट... - HSC board 12th result
Last Updated : May 21, 2024, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details