नागपूर Pune Hit and Run Case: पुणे हिट ॲंड रन प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात राज्य सरकराचा हात असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. एवढंच नाही, तर मृतांचा व्हिसेरा अहवालातही ( Viscera Report ) छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचं देशमुख म्हणाले. मृताचा व्हिसेरा अहवाल तयार करण्यात आला असून तो सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृत व्यक्ती दारु पिऊन गाडी चालवत होते, असं न्यायालयातं दाखवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.
मृतकांच्या व्हीसेराशी छेडछाड :दोन्ही मृतकांच्या व्हीसेरामध्ये अल्कहोलचे अंश टाकण्यात आले, अशी माझ्याकडं पक्की माहिती आहे. आधी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र, तो प्रयत्न फसल्यानंतर आता अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी दुसरा प्रयत्न केला जात आहे. असं झाल्यास आरोपीची निर्दोष मुक्तता होईल. यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचं ते म्हणाले आहेत.
कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न : उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला 31जागेवर विजय मिळाला. त्याच प्रमाणे विधानसभेत देखील आमचाच विजय होणार असल्याचा दावा देखमुखांनी केलाय.