महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस हा नतद्रष्ट माणूस; संजय राऊत यांचा घणाघात

देवेंद्र फडणवीस नतद्रष्ट माणूस असल्याची टीका संजय राऊतांनी केलीय. हा माणूस मराठी माणसाचा अन् शिवाजी महाराजांचा द्वेष करणारा असल्याचं काल सिद्ध झालंय, असंही ते म्हणालेत.

Sanjay Raut
संजय राऊत (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

मुंबई -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलीय. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु देवेंद्र फडणवीस हा नतद्रष्ट माणूस असल्याची टीका संजय राऊत यांनी केलीय. ते मुंबईत बोलत होते.

तुम्हाला लाज का वाटत आहे?:याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हा माणूस मराठी माणसाचा, पूर्ण महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करणारा असल्याचं काल पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आम्ही शिवाजी महाराजांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारत आहोत, याची तुम्हाला लाज वाटत आहे का? अशा माणसाचा महाराष्ट्रात जन्म झाला, यावरदेखील संजय राऊत यांनी टीका केलीय. तुम्ही जिथे सांगाल तिथे आम्ही शिवाजी महाराजांचे मंदिर उभारू, परंतु त्या मंदिरात येण्याची तुमची हिंमत आहे का? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं?: संजय राऊत पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वज मुघलांची चाकरी करून महाराष्ट्राची बदनामी करीत होते, असा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलनाची, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची चेष्टा करतात. आम्ही शिवाजी महाराजांचे मंदिर उभारू असं म्हणालो, तर त्याचीही चेष्टा ते करतात. देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल इतका द्वेष का आहे? याचे कारण फडणवीस यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम नसून ते प्रेम गुजरातवर आहे. शिवाजी महाराजांनी जी सुरत लुटली त्यावर तुमचे प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तुम्ही अरबी समुद्रात उभारणार होतात, त्या स्मारकाचं काय झालं? असा प्रश्नसुद्धा संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचा :

  1. मनसेची साथ सोडवेना; भाजपाची राज ठाकरेंशी मैत्री म्हणजे शिंदेंसाठी 'धोक्याची' घंटा
  2. नाशिकमध्ये मनसेच्या इंजिनला ब्रेक लागणार, वाचा काय आहे कारण...

ABOUT THE AUTHOR

...view details