महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील ३३ विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात - ASSEMBLY ELECTION 2024

यंदा मुंबईतील एकूण ३६ आमदारांपैकी ३३ आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तर दहा ठिकाणी शिवसेनेच्या दोन्ही गटात थेट लढत होत आहे.

Maharashtra election 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2024, 2:29 PM IST

मुंबई - १५ व्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्यातील आणि मुंबईतील विधानसभा रणधुमाळीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. मुंबईत सत्ता कोणाची हा मोठा प्रश्न नेहमीच विधानसभा निवडणुकीत चर्चेत राहिलाय. यंदा मुंबईतील एकूण ३६ आमदारांपैकी ३३ आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तर दहा ठिकाणी शिवसेनेच्या दोन्ही गटात थेट लढत होत आहे.

मानखुर्द शिवाजीनगरमध्ये वडील, तर अणुशक्तीनगरमध्ये कन्या: महायुती असो अथवा महाविकास आघाडी जागावाटपात मुंबईतील जागांचा घोळ हा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)चे अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार नवाब मलिक यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची पाच मिनिटं असताना एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यांनी मानखुर्द - शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर अणुशक्ती नगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अजित पवार गटातून निवडणूक लढवत आहेत. माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्यासमोर उबाठा गटाचे महेश सावंत त्याचबरोबर राजपुत्र अमित ठाकरे यांचं आव्हान असणार आहे. तर वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला असून, ते येथून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

गायकवाड, वायकर लोकसभेत तर राणेंचा पत्ता कट:धारावी मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड या लोकसभेत निवडून गेल्याने धारावीमधून त्यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिलीय. तीच परिस्थिती जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाची आहे. शिंदे सेनेचे आमदार रवींद्र वायकर हेसुद्धा लोकसभेवर निवडून गेल्याने जोगेश्वरी पूर्वमधून त्यांची पत्नी मनीषा वायकर शिंदे सेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने इथून त्यांची कन्या सना मलिक निवडणूक लढवत आहे. तर नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. बोरिवलीचे भाजपाचे विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पक्षाने यंदा पत्ता कट केल्याने त्यांच्या जागी भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिलीय. अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना अणुशक्तीनगर ऐवजी मानखुर्द शिवाजीनगरमधून मैदानात उतरवले गेलेत. समाजवादी पक्षाकडून अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगर मधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबईत दहा मतदारसंघात उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत होत आहे.

वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा

मागाठणेमध्ये उदेश पाटेकर विरुद्ध प्रकाश सुर्वे

जोगेश्वरी पूर्वमध्ये अनंत (बाळा) नर विरुद्ध मनीषा वायकर

दिंडोशीमध्ये सुनील प्रभू विरुद्ध संजय निरुपम

अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल

विक्रोळीमध्ये सुनील राऊत विरुद्ध सुवर्णा कारंजे

भांडुप पश्चिममध्ये रमेश कोरगांवकर विरुद्ध अशोक पाटील

कुर्लामध्ये प्रविणा मोराजकर विरुद्ध मंगेश कुडाळकर

चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर विरुद्ध तुकाराम काते

माहीम महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर

भाजपाकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले १५ आमदार

१) मंगल प्रभात लोढा - मलबार हिल
२) राहुल नार्वेकर - कुलाबा
३) मनीषा चौधरी - दहीसर
४) योगेश सागर - चारकोप
५) अतुल भातखळकर - कांदिवली पूर्व
६) विद्या ठाकूर - गोरेगांव
७) भारती लव्हेकर - वर्सोवा
८) अमित साटम - अंधेरी पश्चिम
९) मिहिर कोटेचा - मुलुंड
१०) राम कदम - घाटकोपर पश्चिम
११) पराग शहा - घाटकोपर पूर्व
१२) कॅप्टन तमिळ सेल्वन - सायन कोळीवाडा
१३) कालिदास कोळंबकर - वडाळा
१४) पराग अळवणी - विलेपार्ले
१५) आशिष शेलार - वांद्रे पश्चिम

एकनाथ शिंदे गटाकडून निवडणुकीत उतरलेले ५ आमदार

१) यामिनी जाधव - भायखळा
२) प्रकाश सुर्वे - मागाठणे
३) दिलीप मामा लांडे - चांदिवली
४) मंगेश कुडाळकर - कुर्ला
५) सदा सरवणकर - माहीम

उद्धव सेनेकडून ८ आमदार निवडणुकीच्या रिंगणात

१) आदित्य ठाकरे - वरळी
२) अजय चौधरी - शिवडी
३) सुनील प्रभू - दिंडोशी
४) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
५) सुनील राऊत - विक्रोळी
६) रमेश कोरगांवकर - भांडुप पश्चिम
७) संजय पोतनीस - कलिना
८) प्रकाश फार्तेपेकर - चेंबूर

काँग्रेसकडून २ आमदार

अमीन पटेल - मुंबादेवी
अस्लम शेख - मालाड पश्चिम

हेही वाचा -

  1. भाजपाचा मुख्यमंत्री अन् मनसे सत्तेत असेल, राज ठाकरे आताच असं का म्हणाले?
  2. मतदारसंघ 21 आणि उमेदवार 1272, 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 उमेदवार रिंगणात

ABOUT THE AUTHOR

...view details