महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघार - Breaking News today

Maharashtra breaking news
Maharashtra breaking news (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 7:42 AM IST

Updated : Jul 10, 2024, 1:33 PM IST

'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. या पेजवर राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला वाचता येतील. विश्वसनीय आणि ताज्या घडामोंडीसाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

5:54 PM, 10 Jul 2024 (IST)

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघार

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघार

त्यांच्याऐवजी आता भूषण पाटील असणार उमेदवार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते भूषण पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

4:33 PM, 10 Jul 2024 (IST)

मिहिर शाह याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी.

3:02 PM, 10 Jul 2024 (IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कोस्टल रोडची पाहणी

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कोस्टल रोडची पाहणी

मुंबईकरांना आता थेट एअरपोर्ट ते नरिमन पॉईंट अंतर काही मिनिटात गाठता येणार

कोस्टल रोडमुळे वरळीवरून वळसा मारून यावा लागतो ते अंतर वाचेल

सोबतच याला जोडूनच तब्बल 300 एकरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क रेस कोर्सच्या मैदानात उभारण्यात येणार

मुंबईकरांना ऑक्सिजनची कमी जाणवते त्यांना देखील आरामाची गरज आहे

त्यासाठीच हे सेंट्रल पार्क उपयुक्त ठरेल

याची जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

3:00 PM, 10 Jul 2024 (IST)

ठाण्यातील पाचपाखाडी भागात चालती दुचाकी पेटली

ठाणे - ठाण्यातील पाचपाखाडी भागात एका चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट.

बाईक स्वार आणि एक व्यक्ती प्रवास करत होते

गाडीला आग लागताच दोघांनी पळ काढला

कोणालाही दुखापत नाही

घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली

मोठ्या प्रमाणात गाडीचे नुकसान

1:25 PM, 10 Jul 2024 (IST)

वरळी हिट अँड रन प्रकरण भोवले, राजेश शाहची शिवेसनेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी

शिवसेनेने वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहचे वडील राजेश शाह याची पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर राजेश शाहला पदावरून मुक्त करण्यात आले.

12:33 PM, 10 Jul 2024 (IST)

जुहूमधील बारवर बुलडोझर, मिहीर शाहच्या घरावर बुलडोझर चालविणार का- आदित्य ठाकरे

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह यानं जुहू येथील बारमध्ये दारू घेतल्याचा आरोप होत आहे. या बारच्या बाधंकामाचा अनधिकृत भाग मुंबई महानगरपालिकेनं बुलडोझरनं पाडला आहे. दुसरीकडं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अपघातामृत्यू झालेल्या कावेरी नाखवाचे पती प्रदीप नाखवा यांची भेट घेऊन सांत्वन केलं. मिहीर शाहच्या घरावर बुलडोझर चालविणार का? आरोपीला कोळीवाड्यात सोडा. मिहीर शाह हा राक्षस आहे.

12:31 PM, 10 Jul 2024 (IST)

विधानभवनात आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली, पाच मिनिटांसाठी कामकाज तहकुब

विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झाल्यानं विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर विरोधी पक्षांनी बैठकीला उपस्थित न राहण्यावरून सभागृहात गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी आणि महायुतीने राज्यात मराठा विरोधी ओबीसी वाद सुरू केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तर विरोधी पक्ष केवळ राजकारण करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला.

12:25 PM, 10 Jul 2024 (IST)

ट्रेडमार्क प्रकरणात आदेशाचे उल्लंघन, पतंजलीला 50 लाख रुपये जमा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद कंपनीला दणका दिला आहे. दुसऱ्या कंपनीने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणात पतंजली कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केले. यावर मुंबई उच्च न्यायालयानं पतंजील कंपनीला 50 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

11:51 AM, 10 Jul 2024 (IST)

युट्यूबर एल्विश यादवला ईडीची नोटीस

ईडीने लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवला रेव्ह पार्टीच्या घटनेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणावरून नोटीस बजाविली आहे. नोटीसनुसार एल्विश यादवला 23 जुलैला उत्तर प्रदेशच्या लखनौ-आधारित युनिटसमोर हजर राहावे लागणार आहे.

10:59 AM, 10 Jul 2024 (IST)

ऑनलाईन जुगार विरोधात जुगार खेळून आंदोलन, पोलिसांनी बच्चू कडु यांना घेतले ताब्यात

ऑनलाईन जुगार विरोधात आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालय शेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ऑफ लाईन जुगार खेळून आंदोलन केले. पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

10:28 AM, 10 Jul 2024 (IST)

मिहीर शाह यांच्या वडिलांचे दाऊदशी संबंध-संजय राऊतांचा गंभीर आरोप

वरळी अँड रनमधील आरोपीच्या वडिलांचे दाऊदशी संबंध आहेत. आरोपीला तीन दिवस लपवून ठेण्यात आले होते. वरळी प्रकरणात आरोपीला पहिल्या दिवसापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीनं ड्र्ग्ज घेतले होते. हे ड्रग्जचे सेवन सापडू नये, म्हणून आरोपीला तीन दिवस लपविले होते. मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय येत आहे. पोलिसांना त्याचा हिशोब द्यावा लागेल. आरोपीला सुटला तर त्याला रस्त्यावर जाब विचारावा. एका निष्पाप महिलेला वारंवार चिरडले. असा आरोपी सुटू नये. राज्यात गुन्हेगारांना पाठिशी घालणारे सरकार आहे.

10:17 AM, 10 Jul 2024 (IST)

भाजपाने जादा दिलेले उमेदवार मागे घेऊन घोडेबाजार थांबवावा-संजय राऊत

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधान परिषद निवडणुकीवरून भाजपावर जोरदार निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले, " क्रॉस व्होटिंगची सत्ताधाऱ्यांना सर्वाधिक भीती आहे. आम्हाला क्रॉस व्होटिंगची भीती नाही. महायुतीच्या अनेक आमदारांना भविष्याची भीती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आणि यंत्रणेच्या बळावर घोडेबाजार केला. भाजपाने जादा दिलेले उमेदवार मागे घेऊन घोडेबाजार थांबवावा."

8:48 AM, 10 Jul 2024 (IST)

शिवाजी पार्कमधील झाडावरून चढून सेन्सॉर बोर्डच्या विरोधात आंदोलन

शिवाजी पार्कमधील एका झाडावर एक व्यक्ती झाडावर चढून अनोखे आंदोलन करत आहे. सेन्सर बोर्डानं एनओसीच्या नावावर पैसे मागितल्याचा त्यानं आरोप केला. प्रवीण कुमार मोहरे असे आंदोलकाचे नाव आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

8:40 AM, 10 Jul 2024 (IST)

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भूंकपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे.

8:18 AM, 10 Jul 2024 (IST)

लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात डबल डेकर बसनं टँकरला धडक दिल्यानं उत्तर प्रदेशमधील लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीसही दाखल झाले आहेत.पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

7:32 AM, 10 Jul 2024 (IST)

बोगद्यात पाणी साचल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

पणजी- पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. गोव्यातील पेरनेम येथे बोगद्यात पाणी साचल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा खोळंबा झाला. कोकण रेल्वे विभागाच्या माहितीनुसार रेल्वे वाहतूक रात्री १०.३४ वाजता पूर्ववत झाली. चार ते पाच गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. दुपारी ३ वाजल्यापासून या गाड्या थांबविण्यात आल्याचं कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितलं.

Last Updated : Jul 10, 2024, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details