बदलापूरBadlapur 2 minor girls rape:बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चार वर्षीय चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूरमधील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांकडून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. या दोन चिमुरडींना न्याय मिळवून देण्यासाठी आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अत्याचाराची घटना घडली, त्या शाळेत बदलापूरकरांचा उद्रेक पाहायला मिळत आहे.
संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड (Source - ETV Bharat Reporter) शाळेची तोडफोड : पहाटे सहा वाजल्यापासून संतप्त नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करत आहेत. संतप्त जमावानं बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करत ठिय्या मांडला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये बदलापूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. संतप्त नागरिकांनी शाळेत तोडफोड केली आहे. या शाळेची तोडफोड करण्यामध्ये महिला आंदोलकही सहभागी आहेत. या घटनेत शाळेतील ज्या जबाबदार व्यक्ती असतील त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आंदोलनात पुरुषांबरोबर महिलाही रेल्वे ट्रॅकवर उतरल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रेल्वे पोलिसांचा मोठा फौजफाटा रेल्वे स्थानकात तैनात केला आहे. यावेळी हातात फलक घेऊन घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तसंच मोठमोठ्यानं घोषणाबाजी करण्यात येत आहे. वी वॉन्ट जस्टीस... फाशी द्या... फाशी द्या आरोपीला फाशी द्या... अशी घोषणाबाजी संतप्त जमावाकडून होत आहे.
कोणालाही सोडणार नाही :"बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाचा आम्ही छडा लावणार आहोत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा
- चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; संतप्त जमावानं रेल्वेसेवा रोखली, बलात्काऱ्याला फाशीची मागणी - Man Raped On 4 Year Girl
- बदलापूर अत्याचार घटनेची सरकारकडून गंभीर दखल; शाळा मुख्याध्यापिका निलंबित, कठोर कारवाईचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश - Badlapur Girls Sexually Assaulted
- बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश - SIT Probe In Badlapur Rape Case