महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणेकरांनो मतदान केल्याची शाई दाखवा आणि प्रशांत कॉर्नरवर समोसा, दही वडा, श्रीखंडवर मारा ताव - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

ठाण्यात मतदानादिवशी प्रशांत कॉर्नर यांनी खवय्यांसाठी खास ऑफर ठेवली आहे. मतदान केल्याची बोटावरील शाई दाखवा आणि ऑफरचा लाभ घ्या.

Voters
मतदान केल्याची शाई दाखवताना तरूणी (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2024, 10:54 PM IST

ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पुढच्या काही तासांनी मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदानासाठी प्रशासनानं सर्व तयारी केली आहे. तर मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करुन देशाला चांगले आणि स्थिर सरकार द्यावे, याकरीता अनेक सामाजिक संस्था कार्यरत असतात. ठाणातील प्रशांत कॉर्नरने देखील मतदानाच्या दिवशी अभिनव उपक्रम आयोजित केल्याची माहिती प्रियांका सकपाळ यांनी दिली.

बोटावरील शाई दाखवा आणि ऑफरचा आनंद लुटा : ठाणेकरांनो मतदान केल्याची शाई दाखवा आणि प्रशांत कॉर्नरवरला लगेच ताव मारायला जावा. कारण जो लोकशाहीच्या उत्साहात साजरा करेल त्यांना ठाण्यातील प्रश्नात कॉर्नरने खास ऑफर ठेवली आहे. मतदान केल्याची बोटावरील शाई दाखवली तर ऑफरमध्ये समोसा, दही वडा, श्रीखंड, पुरी भाजी, मुंबई हलवाचा आनंद लुटता येणार आहे.

प्रतिक्रिया देताना प्रियांका सकपाळ (ETV Bharat Reporter)


खवय्यांसाठी खास ऑफर: विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. एकीकडं मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडं ठाण्यातील प्रसिद्ध असलेल्या प्रशांत कॉर्नर या मराठी दुकान मालकाने खवय्यांसाठी खास ऑफर ठेवली आहे. यामध्ये पंजाबी समोसा २०, दही वडा ७०, मँगो श्रीखंड २००, केशर श्रीखंड २००, पुरी भाजी १००, मुंबई हलवा ३०० आणि बदाम मिल्क ५० फक्त रुपयांना मिळणार आहे. ही सुवर्ण संधीची प्रशांत कॉर्नरच्या कुठल्याही शाखेत लाभ घेता येणार आहे. ही ऑफर फक्त एका दिवसांकरिता मर्यादित असणार असल्याची माहिती, प्रियांका सकपाळ यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. मतदान कार्ड हरवलंय?, 'हे' 12 प्रकारचे पुरावे दाखवून करा मतदान
  2. मतदानाला उरले काही तासच! राज्यातील 288 मतदारसंघात तयारी पूर्ण
  3. मतदान केंद्रांवर आकर्षक सेल्फी बूथ, मात्र मोबाईल नेण्यास बंदी; महिलांसाठी खास पिंक केंद्र

ABOUT THE AUTHOR

...view details