मुंबईAnjali Birla Defamation : 5 जुलै रोजी तक्रारदार नमन वरी यांनी 28 जून ते 5 जुलै रोजी पर्यंत Dhruv Rathee (Parody) @dhruvrahtee या ट्विटर हँडल धारकाने अंजली बिर्ला यांच्याबाबत पसरवलेल्या बनावट ट्विटमुळे अंजली यांच्या प्रतिष्ठेला आणि सद्भावनेला हानी पोहोचवित असल्याची तसेच यूपीएससी आयोगाबद्दल जाणून बुजून जनतेत गोंधळ आणि अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नोडल सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 78, 79, 318 (2), 352, 356( 2), 353 (2), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (क) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यशस्वी यादव अंजली बिर्ला प्रकरणी मत मांडताना (Etv Bharat Reporter) अंजली बिर्ला रेल्वे मंत्रालयात कार्यरत :सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार वरी यांची मामे बहीण अंजली बिर्ला यांची Dhruv Rathee (Parody) आणि इतर ट्विटर (X) हँडलधारक या युजर विरुद्ध तक्रार आहे. त्यावर त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे जोरदार फिरवण्यात आली आहेत. अंजली बिर्ला या आयआरपीएस अधिकारी म्हणून रेल्वे मंत्रालयात दिल्ली येथे काम करतात. 2019 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा येथे अंजली बिर्ला यांनी अर्ज केला आणि योग्य प्रक्रियेद्वारे परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्या भारतीय रेल्वेत कार्मिक सेवा अधिकारी म्हणून रेल्वे मंत्रालय, भारत सरकार दिल्ली येथे काम करत आहे.
अंजली बिर्ला विषयी अनादरनीय टिपण्णी :फिर्यादी व्टिटर (X) हॅन्डल वापरत असताना त्यांना Dhruv Rathee (Parody) @dhruvrahtee व्टिटर (X) हॅन्डलवर अंजली बिर्ला यांच्याबाबत बदनामीकारक व्टिट केले असल्याचं दिसून आल्याची माहिती अंजली बिर्ला यांना दिली. त्यांनीसुद्धा व्टिट पाहिले. हे व्टिट दिनांक 28 जून रोजी पासून ते आजपावेतो Dhruv Rathee (Parody) @dhruvrahtee या व्टिटर (X) हॅन्डल माध्यमावर आणि इतर व्टिटर (X) हॅन्डल धारकांनी व्टिटर (X) हॅन्डलवर अंजली बिर्ला यांच्या बाबतीत प्रतिष्ठेवर आक्षेप घेणारे अनेक अपमानजनक पोस्ट केले जात आहेत. ज्यात नमूद व्टिटरधारक हे अंजली बिर्ला हिचे खासगी फोटो तिच्या परवानगीशिवाय शेअर करीत आहेत. यात खोटी आणि अनादरणीय टिप्पणी करत आहेत की, ती "प्रोफेशनल मॉडेल" होती आणि "एका प्रयत्नात IAS अधिकारी बनली." हे दावे खोटे आणि निराधार आहेत; कारण तिने कधीही मॉडेलिंग केली नाही. तसेच तिचे खासगी फोटोग्राफ्स व्टिटरवर (X) प्रसारित करण्याच्या उद्देशाने प्राप्त करून स्त्रीच्या शील आणि प्रतिष्ठेवर हल्ला करण्यासोबतच तिच्या प्रतिमेचा गैरवापर करून तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन केलेले असल्याचे जबाबात माहिती देण्यात आली आहे.
बिर्ला यांच्या लौकिकास नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न :अंजली बिर्ला हिचे वडील ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष असल्यामुळे त्या UPSC परीक्षा न देता पास झाल्या. अशा या आशयाची विधाने करून अंजली बिर्ला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या लौकिकास नुकसान पोहोचविण्याचा उद्देशपूर्वक प्रयत्न केला आहे.
हेही वाचा :
- RSS बदनामी प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द, राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा - Rahul Gandhi RSS defamation Case
- महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवणारं 'ते' पत्र फेक; पोलिसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणार
- अशिलाची फसवणूक प्रकरणानं व्यवसायाची बदनामी, मुंबई उच्च न्यायालयानं वकिलाचा फेटाळला जामीन अर्ज