महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिंदेंच्या ठाण्यात कोण बाजी मारणार? नरेश म्हस्के आघाडीवर, तर राजन विचारे पिछाडीवर - Thane Lok Sabha Results 2024

Thane Lok Sabha Election Results 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणेनगरीत शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात दुहेरी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळं या लढतीत कोण बाजी मारेल याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

THANE LOK SABHA RESULTS 2024
ठाणे लोकसभा निवडणूक निकाल (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 3:09 PM IST

ठाणे Thane Lok Sabha Election Results 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. त्यामुळं या लढतीत कोण बाजी मारेल याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय. तसंच मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून नरेश म्हस्के आघाडीवर असल्याचं बघायला मिळालं.

मुंबईच्या उत्तरेस असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा देखील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. 2011 च्या जनगणनेत, हा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. नंतर ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. ठाणे जिल्हा तलावांसाठीही ओळखला जातो. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या या भागात पूर्वी पोर्तुगीज, मराठे, इंग्रजांचे राज्य होतं. 19 फेब्रुवारी 2008 रोजी या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. यामध्ये मीरा भाईंदर, कोपरी-पाचपाखाडी, औवळा-माजिवडा, ठाणे, ऐरोली आणि बेलापूरचा समावेश आहे. त्याचवेळी पुनर्रचनेत या मतदारसंघाचे ठाणे आणि कल्याण, असं विभाजन करण्यात आले.

ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 2008 मध्ये, भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचं ठाणे आणि कल्याण या दोन नवीन मतदारसंघांचं विभाजन केलं. यंदा या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे तसंच शिवसेनेचे शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात लढत झाली. ही दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात होती. ठाणे मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे.

ठाणे मतदारसंघावर शिंदे गट तसंच भाजपा या दोघांनी दावा केला होता. ठाणे मतदारसंघातून भाजपाकडून संजय केळकर निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. तर शिंदे गटातून माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. या इच्छुक उमेदवारांमुळं महायुतीचे जागावाटप लांबलं होतं. ठाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनंही प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत होतं. ते ओवळा-माजिवडा विधानसभेचे आमदार आहेत. मात्र अखेर मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.

नरेश म्हस्के हे ठाण्याचे महापौरही होते. 2012 पासून ते सातत्यानं ठाणे महापालिकेत निवडून येत आहेत. बंडानंतर म्हस्के हे नेहमीच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दिसत होते. ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी ते माध्यमांसमोर येत होते . ठाण्यात नरेश म्हस्के यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्याशी झाला. ठाकरे गटाने या मतदारसंघात राजन विचारे यांना उमेदवारी दिली होती.

काँग्रेसचे 1984 मध्ये शांताराम घोलप येथून खासदार झाले. भाजपचे राम कापसे 1989 आणि 1991 मध्ये दोनदा निवडून आले. 1996 नंतर सलग 4 वेळा ही जागा शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्याकडे होती. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये येथे पोटनिवडणूक झाली ज्यात त्यांचा मुलगा आनंद परांजपे विजयी झाला. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजीव नायक विजयी झाले होते. मोदी लाटेत ही जागा भाजप-शिवसेना युतीकडे गेली. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे राजन विचारे येथून खासदार म्हणून निवडून आले होते.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल :

वर्ष- 2019 : राजन विचारे (विजयी उमेदवार-शिवसेना) 63.03% मतं

वर्ष- 2014 : राजन विचारे (विजयी उमेदवार-शिवसेना) 56.48% मतं

वर्ष- 2009 : संजीव नाईक (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 40.14% मतं

वर्ष- 2008 : आनंद परांजपे (विजयी उमेदवार-शिवसेना) 52.02% मतं

वर्ष- 2004 : प्रकाश परांजपे (विजयी उमेदवार-शिवसेना) 48.08% मतं

वर्ष- 1999 : प्रकाश परांजपे (विजयी उमेदवार-शिवसेना) 43.22% मतं

हेही वाचा -

  1. सांगली लोकसभा निवडणूक निकाल : सांगलीची पाटीलकी कोणाकडे; विशाल, संजय की चंद्रहार? - Sangli Lok Sabha Election Results 2024
  2. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची आघाडी, सांगली लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? - Lok Sabha election results 2024
  3. पालघरमध्ये कोण उधळणार विजयी गुलाल? - Lok Sabha Election Results 2024

ABOUT THE AUTHOR

...view details