मुंबई Lok Sabha Election Results 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या मंगळवारी 2 जून रोजी लागणार आहे. मागील दीड-एक महिन्यापासून म्हणजे लोकसभा निवडणूक मतदान सुरू असताना शेअर बाजारात कधी अप तर कधी डाऊन अशी दोलायमय परिस्थिती पाहयला मिळाली. लोकसभा निकालापूर्वी मुंबई शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असून, गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सकारात्मकता दिसून येत आहे. परंतु, उद्या निकालानंतर मुंबई शेअर बाजारात आणखीन तेजी दिसून येईल का? बाजार वधारेल का? कोणत्या शेअर्शना अधिक मागणी असेल? किंवा काय असेल उद्याची परिस्थिती? यावर तज्ज्ञांनी काय म्हटलंय पाहूया...
कसं असेल उद्याचं चित्र? :लोकसभा निवडणूक निकालाचे जे सर्वे समोर आलेले आहेत. त्या सर्वेतून साधारण तीनशे ते साडेतीनशे प्लस जागा एनडीएला (भाजपा) दाखवल्या आहेत. म्हणजे पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे सर्वेतून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासूनच याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. आजपासून मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी हे दोन्ही वधारले आहेत. त्यामुळे उद्या निकाल हा एनडीएच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता असल्याचा समज गुंतवणूकदारांमध्ये आहे. म्हणून निकाल लागण्याआधीच शेअर बाजाराची तेजी आली आहे. त्या तेजीने उद्याच्या निकालाला सलामी दिली आहे. आणि उद्या बाजारात आणखी तेजी वाढेल आणि गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक सकारात्मकता दिसून येईल, असं सीए, निखिलेश सोमण, शेअर बाजार अभ्यासक यांनी म्हटलं आहे.
तेजी की पडझड...? :सध्या बाजाराची (गुंतवणूकदारांची) एनडीए सरकार येणार आहे, अशी मानसिकता झालेली आहे. 'अबकी बार चारशे पार...' ही मोदींनी घोषणा दिली आहे. जरी एनडीएचे तेवढे खासदार नाही आले आणि 350 खासदार आले तरी देखील बाजारात तेजी दिसून येईल. मात्र 300 पेक्षा कमी जागा आल्या तर बाजारात मात्र थोड्याफार प्रमाणात पडझड होऊ शकते. कारण प्राथमिक अंदाजानुसार एनडीएचे सरकार येणार आहे असं बोललं जातंय. हे सरकार स्थिर सरकार असल्यामुळं अनेक गुंतवणूकदार हे आज प्रॉफिट बुक करताहेत. अनेकजण विविध शेअर्स विकत घेताहेत. सध्याच्या वातावरणानुसार भविष्यात त्याचा नक्कीच फायदा त्यांना होईल. परंतु, जर एनडीएचे सरकार आलेच नाही किंवा त्यांना 300 किंवा 250 पेक्षा जागा कमी मिळाल्या तर मात्र बाजारात पडझड होऊ शकते. असंही सीए, निखिलेश सोमण, शेअर बाजार अभ्यासक यांनी म्हटलं आहे.