महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अगोदर मतदान, त्यानंतरच केलं पार्थिवावर अंत्यसंस्कार; नागपुरातील 'या' कुटुंबांनी समाजासमोर ठेवला आदर्श - Nagpur

Nagpur News : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज (19 एप्रिल) पार पडलं. मात्र, यादरम्यान नागपुरातील दोन कुटुंबांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कुटुंबातील सदस्याचं निधन झालेलं असतानाही या कुटुंबांनी मतदानाचं कर्तव्य बजावत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

Lok Sabha Election 2024 Two families in Nagpur performed the duty of voting despite the death of family member
अगोदर मतदान, त्यानंतरच केलं पार्थिवावर अंत्यसंस्कार; नागपुरातील 'या' कुटुंबांनी समाजासमोर ठेवला आदर्श

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 9:13 PM IST

Updated : Apr 19, 2024, 9:35 PM IST

नागपूर Nagpur News :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांवर मतदान झालं. मतदानादरम्यान तुरळक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या तर इतर ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं. मात्र, या दरम्यान नागपूरमधील दोन कुटुंबांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

समाजासमोर ठेवला आदर्श :तात्या टोपे नगर येथील अभिनव राम कऱ्हू (वय 38) यांचं 19 एप्रिलला पहाटे निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांच्या मातोश्री मैथिली कऱ्हू आणि पत्नी श्रुती कऱ्हू या दोघीही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराच्या बाहेर पडल्या. कुटुंबावर संकट कोसळलं असलं तरीही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी घराबाहेर पडून कऱ्हू कुटुंबानं समाजापुढं आदर्श निर्माण केला आहे.

कुटुंबावर शोककळा असतानाही केलं मतदान : तर दुसरीकडं बगडगंज येथील खेमानी परिवारानं देखील आपल्या कृतीतून सर्वांचं लक्ष वेधलं. बगडगंज येथील मदन मोहन खेमानी (वय 74) यांचं 18 एप्रिलला निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊन चोवीस तासही उलटायचे असताना कुटुंबातील 27 सदस्य मतदानासाठी बाहेर पडले आणि आदर्श प्रस्थापित केला.

नागपुरात 47.91 टक्के मतदान :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेस सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे अशी थेट लढत होत आहे. या मतदारसंघात आज 47.91 टक्के मतदान झालं. नागपूर मतदारसंघासाठी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह मतदान केलं.

हेही वाचा -

  1. जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगेंनी बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन - Lok Sabha Election 2024
  2. बापरे! मतदान केंद्रात निघाला विषारी साप, मतदार गोंधळले - Lok Sabha Election 2024
  3. निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम! विशिष्ट थीमवर तयार केले मतदान केंद्र, पाहा व्हिडिओ - Theme Voting Center
Last Updated : Apr 19, 2024, 9:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details