महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' शहरात मध्यरात्री बिबट्याचा वावर, सीसीटीव्हीत हालचाल झाली कैद - Leopard Chhatrapati Sambhajinagar - LEOPARD CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

Leopard Spotted in CCTV : शहरातील उल्कानगरी भागात सोमवारी (15 जुलै) मध्यरात्री बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.

leopard spotted in Chhatrapati Sambhajinagar, movement caught in CCTV camera
छत्रपती संभाजीनगरात बिबट्याचा खुलेआम वावर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 12:19 PM IST

Updated : Jul 16, 2024, 12:54 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Leopard Spotted in CCTV: शहरी भागात सध्या बिबट्याचा वावर सुरू असल्याचं एका सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालंय. त्यामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. उल्कानगरी भागात सोमवारी मध्यरात्री रस्त्यावरून फिरत असताना बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर त्याभागातील सीसीटीव्ही तपासण्यात आले असता धक्कादायक वास्तव समोर आलं. वन विभागानं सोमवारी रात्री परिसरात पिंजरे बसवले आहेत.

छत्रपती संभाजीनगरात बिबट्याचा खुलेआम वावर (ETV Bharat Reporter)
शहरात बिबट्याची दहशत : सोमवारी मध्यरात्री रस्त्यावरून बिबट्या मुक्त वावर करत असल्याचं सीसीटीव्हीमधून स्पष्ट झालंय. सोमवारी दिवसभर या घटनेची चर्चा होती, मात्र खात्रीलायक कोणालाही माहिती नसल्यानं त्या घटनेकडं गांभीर्यानं पाहण्यात आलं नाही. मात्र, सीसीटीव्ही तपासल्यावर ही बाब उघडकीस आली. सोमवारी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास उल्कानगरी परिसरात लाईट गेली. त्यानंतर लाईनमन असलेले दत्ता ढगे हे तपासणीसाठी बाहेर पडले. सर्वत्र अंधार होता. त्यावेळी गाडीच्या लाईटच्या उजेडात बिबट्या जात असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी तातडीनं परिसरातील नागरिकांना सतर्क केलं. त्यानंतर यासंदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली.वनविभागानं केली तपासणी : वन विभागानं यासंदर्भात पडताळणीला सुरुवात केली. मात्र, त्यांना पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळं ही नुसती अफवा असल्याचं बोललं गेलं. मात्र, नागरिकांनी सीसीटीव्ही तपासला असता सोमवारी मध्यरात्री साडेतीन वाजता बिबट्याचा वावर असल्याचं आढळून आलं. तसंच त्या भागातील नाल्याजवळ असलेल्या झाडांमध्ये बिबट्या गेल्याचं दिसलं. त्यानंतर तातडीनं वन विभागाकडून परिसरात पिंजरे लावण्यात आले. तसंच नागरिकांना दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद करून घरातच राहण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. नागरिकांना सतर्क राहण्याच्या इशारा देण्यात आलाय.
Last Updated : Jul 16, 2024, 12:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details