कोल्हापूर Police Detain Chetan Patil : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राज्यभर संताप आहे. या प्रकरणी स्ट्रक्चरल डिझायनर चेतन पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री तीन वाजता ताब्यात केली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे. चेतन पाटील याला ताब्यात घेऊन मालवण पोलिसांकडं सुपूर्द करण्यात आलं आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी दिली.
मालवणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेतील प्रकल्प डिझायनर चेतन पाटील याचा पोलीस शोध घेत होते. अखेर गुरुवारी रात्री कोल्हापुरातील त्याच्या घरातून पाटील याला ताब्यात घेण्यात आलं असून मालवण पोलिसांकडं पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आलं आहे. - रवींद्र कमळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
चेतन पाटीलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या :राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. त्या पत्राच्या स्ट्रक्चरल डिझाईनचं काम करणाऱ्या कोल्हापुरातील चेतन पाटील याच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्याचं राहतं घर असलेल्या कोल्हापुरातील शिवाजी पेठेतून तो फरार झाला. कोल्हापूर आणि मालवण पोलीस त्याचा शोध घेते होते. मालवण पोलिसांचं एक पथक कोल्हापुरात येऊन चेतन पाटील याचा शोध घेत होते. मात्र घराला कुलूप असल्यामुळे गेली तीन दिवस त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गुरुवारी मध्यरात्री शिवाजी पेठेतील त्याच्या घरातून चेतन पाटील याला ताब्यात केली. कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटील याला मालवण पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या पाठीमागं नेमकी कारणं काय आहेत, हे आता चेतन पाटील याच्या चौकशीतून समोर येणार आहे. तत्पूर्वी चेतन पाटील यानं "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात मी फक्त चबुतराच्या स्ट्रक्चरल डिझाईनचं काम केलं आहे. पुतळा दुर्घटनेशी माझा कोणताही संबंध नाही," अशी भूमिका घेतली. मात्र तरीही कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटील याचा माग काढून त्याला मध्यरात्री ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांवर होता दबाव : पुतळा दुर्घटनेनंतर राजकोट किल्ल्यावर गुरुवारी राणे समर्थक आणि महाविकास आघाडीच्या नेते पदाधिकाऱ्यांत चांगलाच राडा झाला. यामुळे या पुतळ्याचं काम करणारा आपटे आणि डिझायनर चेतन पाटील फरार असल्यानं पोलिसांवर दबाव वाढला. कोल्हापुरात मालवण पोलिसांचं एक पथक तळ ठोकून होतं, मात्र चेतन पाटील यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. दरम्यान कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं नातेवाईक आणि मित्रमंडळींकडं चौकशी करून अखेर चेतन पाटील याला गुरुवारी मध्यरात्री ताब्यात घेतलं.
हेही वाचा :
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी गठीत केली संयुक्त तांत्रिक समिती, नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश - Chhtrapati Shivaji Maharaj Statue
- "वडिलांचा पुतळासुद्धा उद्धव ठाकरेंनी सरकारच्या..."; राजकोट राड्यानंतर नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
- आठ महिन्यात पुतळा पडतोच कसा, न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी करा; संजय राऊतांची मागणी - Shivaji Maharaj Statue Incident