महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णालयातील कामगारानं केला घात; बुरखा घालून आला अन्... - Mira Bhayandar Crime

Mira Bhayandar Crime : कोणावर किती विश्वास ठेवायचा हे सध्याच्या काळात कळेनासं झालंय. कोण, कसं आणि कुठून चोरी करेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना मिरा भाईंदरमध्ये घडली. वाचा सविस्तर बातमी....

Mira Bhayandar Crime
चोरी करणाऱ्या त्रिकुटाला अटक (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 5:03 PM IST

मिरा भाईंदर Mira Bhayandar Crime : मिरारोडच्या विनय नगर परिसरात एका खासगी रुग्णालयातून 21 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून काशिगाव पोलीस ठाण्यात (Kashigaon Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केलीय.

काय आहे नेमकं प्रकरण? : मिरारोड येथील राधा रुग्णालयामध्ये एकवीस लाखाची चोरी झाल्याची घटना घडली होती. यात एक महिला बुरखा घालून रुग्णालयात चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. यातील दोघे याच रुग्णालयात कामाला होते. त्यातील मनीष कुमार मिश्राला रुग्णालयातील सर्व माहिती होती. रुग्णालय चालक कुठे पैसे ठेवतात? याचा सर्व अभ्यास करून मनीषने दोन आपल्या साथीदारांना ही माहिती दिली. कोणाला संशय येऊ नये म्हणून तो उत्तर प्रदेशाला निघून गेला. त्यानंतर बुरखा घालून 21 लाख लंपास केले.

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड (Source : Kashigaon Police)

काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : राधा रुग्णालयाचे मालक कपिल शुक्ला यांनी 20 सप्टेंबर रोजी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी काशिगाव गुन्हे प्रकटीकरण टीमला तपासाची सूत्र सोपवली. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत मुख्य आरोपी मनीष कुमार मिश्राला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं. तर बिहारमधून एकाला तर उत्तर प्रदेशातून तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.

चोरी केल्याची दिली कबुली : या त्रिकुटांनी चोरी केल्याचं कबूल केलं. त्यांच्याकडून 18 लाखाची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. उर्वरित तीन लाख रुपये तिघांनी खर्च केल्याचं उघड झालं. ही कारवाई काशिगाव गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक अभिजीत लांडे आणि त्यांच्या टीमनं केल्याची माहिती, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा -

  1. बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या 5 बांगलादेशी महिलांना मिरा रोडमधून अटक - Bangladeshi Nationals Arrest
  2. काशिमीरा पोलिसांची मोठी कामगिरी; १०२ मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना केले परत
  3. राबोडी येथे NIA ची धाड; बापे कुटुंबाची केली चार तास कसून चौकशी, मोबाईल घेतला ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details