महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील केळवली धबधब्यात पोहताना कराडचा तरूण बुडाला, रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू - Karad youth drowned - KARAD YOUTH DROWNED

Karad youth drowned : पावसाळी पर्यटनावेळी अतिउत्साहीपणा करणे जीवावर बेतण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना रविवारी साताऱ्यातील केळवली धबधब्यात घडली. धबधब्याखालील पाण्यात पोहताना कराडमधील तरूण पाण्यात बुडाला.

Karad youth drowned
केळवली धबधब्यात तरूण बुडाला (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 11:04 PM IST

साताराKarad youth drowned : मित्रांसोबत पावसाळी पर्यटनासाठी आलेला तरूण केळवली (ता. सातारा) येथील धबधब्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आलं नाही. ऋषिकेश रमेश कांबळे (वय २२), असं पाण्यात बुडालेल्या तरूणाचं नाव आहे.

पोहायला पाण्यात उतरला आणि बुडाला :कराडमधील ऋषिकेश कांबळे हा रविवारच्या सुट्टीनिमित्त आपल्या मित्रांसमवेत केळवली धबधबा पाहण्यासाठी गेला होता. त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले. ऋषिकेशलाही पोहण्याचा मोह आवरला नाही. तोही पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

रेस्क्यू टीमने राबवली शोध मोहीम :धबधब्यात तरूण बुडाल्याची माहिती मिळताच रविवारी दुपारी शिवेंद्रसिंहराजे रेस्कयु टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तासभर शोध घेतला. परंतु, पाण्याच्या दाबामुळे बोटीमध्ये पाणी शिरले. रेस्क्यू टीमने गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो देखील असफल ठरला. त्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली.

शोध कार्यात नैसर्गिक अडथळे :पावसाचा जोर, पाण्याचा दाब पाहता तरूणाला शोधण्यात दोन-तीन दिवस लागू शकतात, असे रेस्क्यू टीमच्यावतीने सांगण्यात आलं. दरम्यान, ऋषिकेश कांंबळे हा पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी पुन्हा शोध घेतला जाणार आहे. या घटनेची नोंद सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

हे वाचलंत का :

  1. वसतिगृह बांधण्याच्या नावाखाली उकळले 9 कोटी; 'तिकडी'विरोधात गुन्हा दाखल - Mumbai Fraud News
  2. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री: संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य - Bhide Controversial Statement
  3. रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा हवाच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी - Ramdas Athawale

ABOUT THE AUTHOR

...view details