नवी दिल्ली/मुंबई- मुंबईतील नौदलाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं सात उपखंडातील जगातील सर्वात उंच सात शिखरे सर केली आहेत. काम्या कार्तिकेयन असे या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती सध्या बारावीत शिकत आहेत. तिच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहेत.
काम्या कार्तिकेयन ही सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात कमी वयाची महिला ठरली आहे.
काम्यानं ही शिखरे केली सर
- माउंट किलीमांजारो (आफ्रिका)
- माउंट एल्ब्रस (युरोप)
- माउंट कोशियस्को (ऑस्ट्रेलिया)
- माउंट अकोनकाग्वा (दक्षिण अमेरिका)
- माउंट डेनाली (उत्तर अमेरिका)
- माउंट एव्हरेस्ट (आशिया)
- माउंट विन्सन (अंटार्क्टिका)
सात शिखर सर करण्याचं आव्हान पूर्ण करण्यासाठी 24 डिसेंबर रोजी चिली मानक वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून २० मिनिटाला सौम्या ही वडील एस कार्तिकेयन यांच्यासह माउंट व्हिन्सेंट अंटार्क्टिका शिखरावर पोहोचली होती, असे भारतीय नौदलानं म्हटलं आहे. हा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल भारतीय नौदलानं काम्या कार्तिकेयन आणि तिच्या वडिलांचे अभिनंदन केले. नौदलाच्या प्रवक्त्यानं एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटले, "सात खंडातील सात सर्वोत उंच शिखर सर करून मुंबईतील बारावीची विद्यार्थिनी काम्या कार्तिकेयन ही जगातील सर्वात तरुण महिला ठरली आहे. नवा इतिहास रचला आहे भारतीय नौदलाकडून काम्या कार्तिकेयन आणि तिच्या वडिलांचे हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन ," असे पोस्टमध्ये म्हटलं आहे.
- मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कूलनं (एनसीएस) देखील 17 वर्षांच्या काम्याचं अभिनंदन केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "काम्यानं अडथळे पार करत नवीन उंची गाठलीय! सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर केल्यानं एनसीएस मुंबईसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे!
- यापूर्वीदेखील थक्क करणारी कामगिरी-काम्या कार्तिकेयननं वयाच्या सोळाव्या वर्षी एव्हरेस्ट सर केला होता. तर वयाच्या सातव्या वर्षी उत्तराखंडमध्ये पहिले गिर्यारोहण केलं होतं. तिच्या उत्तुंग यशानं अनेक विद्यार्थिनींसह गिर्यारोहकांना प्रेरणा मिळत आहे.
हेही वाचा-
- वयाच्या 16 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी काम्या कार्तिकेयन आहे तरी कोण? जाणून घ्या तिचे आत्तापर्यंतचे विक्रम - Kamya Karthikeyan
- मुंबईची 'काम्या' ठरली जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक; अर्जेंटिनामधील 'अॅकॉन्ग्वा' केले सर