नागपूर-"जस्टिस डिलेड मीन्स जस्टिस डीनाईड" अशा प्रकारचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलीय. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे. आमच्यावरही एक केस होती, त्याची सुनावणी अनेक वर्षे चालली होती. संपूर्ण दिवसभर मी न्यायालयात बसून राहायचो. मात्र, कधी निर्णय लागला नाही आणि मी निर्दोष ही सुटलो नाही, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. आपल्या विधी क्षेत्रात बदल व्हायला हवेत आणि त्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. खटल्यांसाठी लागणाऱ्या वेळेकडे लक्ष दिले पाहिजे, कारण वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. मी माझ्या विभागात बघतो की, वेळेत निर्णय होत नाहीत, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. वकिलाला एखाद्या प्रकरणाला किती तारखा मिळाल्या पाहिजेत, याच्यावरही काही नियंत्रण असावे. काही वकील फक्त तारखा घेऊन प्रकरण पुढे ढकलत असतात, असंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय.
स्वतंत्र निष्पक्ष न्यायपालिका आणि लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाला 100 वर्ष पूर्ण झालीत, या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मला अभिमान वाटतोय. अनेक नामांकित व्यक्ती याचं महाविद्यालयात शिकले. महाविद्यालयाच्या काळात मी विद्यार्थी नेता झालो. इथे येऊन आज जुन्या आठवणी ताज्या झाल्या, असेही नितीन गडकरी म्हणाले आहेत. स्वतंत्र निष्पक्ष न्यायपालिका लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामधील मूलभूत तत्त्वे महत्त्वाची असून, ती कोणीही बदलू शकत नाही. संविधानावरच आपली लोकशाही टिकून आहे. आज विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा कल सरकारी शाळा अन् महाविद्यालयांपेक्षा खासगी महाविद्यालय अन् विद्यापीठांकडे आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचंही ते म्हणालेत.
संविधान बरं किंवा वाईट नसतं तर...- फडणवीस :विशेष म्हणजे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा विधी शाखेचा अभ्यास करत "बॅचलर ऑफ लॉ"ची डिग्री मिळवली होती. त्यामुळे एका प्रकारे मुख्यमंत्री आपल्याच महाविद्यालयात मुख्यमंत्री म्हणून पोहोचले होते. माझ्या व्यक्तिमत्त्वाचा जो काही विकास मग तो बरा असेल किंवा वाईट याच महाविद्यालयात शिकताना झालाय. ज्या पद्धतीचे शिक्षण माझ्या महाविद्यालयात मिळतं, तशा प्रकारचे शिक्षण इतर कुठे मिळत असेल, असं मला वाटत नाही. आमदार झाल्यानंतर तिसऱ्याचं वर्षी मला उत्कृष्ट आमदार म्हणून पुरस्कार मिळाला, कारण माझ्या शिक्षकांनी कायदे आणि विधीक्षेत्रातले ज्ञान मला एवढ्या परिणामकारक पद्धतीने दिलं होतं की, त्यामुळे मी उत्कृष्ट आमदार होऊ शकलो. एका दगडावर कोरलेले पाहिलं होतं संविधान बरं किंवा वाईट नसतं तर त्याला राबवणारे व्यक्ती बरे किंवा वाईट असतात, हेच वाक्य माझ्या जीवनातले मार्गदर्शक तत्त्व आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.
तर चांगले वकील अन् चांगले न्यायाधीश तयार करावे लागतील- मुख्यमंत्री : लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कायद्याचे राज्य. आपल्या लोकशाहीत लोकांचा सर्वाधिक विश्वास न्यायपालिकेवरचं आहे आणि हा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर चांगले वकील आणि चांगले न्यायाधीश तयार करावे लागतील. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये सुनावणी घेतल्या जात आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला या क्षेत्रात नवे बदल घडवता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या नवीन वास्तूसाठी जी काही मदत लागेल, ती राज्य सरकार करेल. तुम्ही निश्चित कालावधीत ही इमारत बांधून तयार केली पाहिजे. राज्य सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही. शताब्दी वर्षांमध्येच त्याचे काम सुरू केले पाहिजे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
जस्टिस डिलेड मीन्स जस्टिस डीनाईड, नितीन गडकरी असं का म्हणाले? - NITIN GADKARI
वकिलाला एखाद्या प्रकरणाला किती तारखा मिळाल्या पाहिजेत, याच्यावरही काही नियंत्रण असावे. काही वकील फक्त तारखा घेऊन प्रकरण पुढे ढकलत असतात, असंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय.
Published : Jan 29, 2025, 2:28 PM IST
|Updated : Jan 29, 2025, 4:10 PM IST
मुख्यमंत्री जुन्या आठवणीत रमले :खरं तर याच महाविद्यालयात आम्ही शिकलो, इथे आमच्या अनेक आठवणी आहेत. कॉलेजच्या अवतीभोवती सर्व समोसेवाले, चहावाले यांची उसनवारी पूर्ण चुकता केलीय, कॅन्टीनचे पैसेही पूर्ण दिलेले आहेत. जुन्या इमारतीचे मॉडेल आमच्या आठवणीसाठी बनवून ठेवा. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाविद्यालयात महाविद्यालयीन काळातील आठवणींमध्ये रमल्याचं पाहायला मिळालं, तेव्हा विद्यार्थी म्हणून काय काय केले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा-