महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बांगलादेशातील हिंदूंसह अन्य अल्पसंख्यकांवरील अत्याचारांचा सकल हिंदू समाजातर्फे तीव्र निषेध; राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चा - BANGLADESH HINDUS

बांगलादेशातील अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात राज्यात विविध ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला.

Jan Akrosh Morcha
राज्यात विविध ठिकाणी तीव्र निषेध (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 10:49 PM IST

नागपूर : बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी निषेध मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर नागपुरात सकल हिंदू समाजातर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी निदर्शकांनी सहा ठिकाणांहून बाईक रॅली काढून आक्रोश केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या पंतप्रधानांना निवेदन दिलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा लावून धरावा: "हिंदूंवरील अत्याचार ताबडतोब थांबावा, बांगलादेशातील स्थिती पूर्वपदावर यावी आणि तेथील सर्व अल्पसंख्य समाजाचे जीवन सुकर आणि सुरक्षित व्हावे, यासाठी सकल हिंदू समाजातर्फे भारत आणि बांगलादेश सरकारकडं अनेक मागण्या केल्या. हिंदू, बौद्ध, शिख, जैन आणि अन्य अल्पसंख्यकांवरील हल्ले, अत्याचार थांबावेत म्हणून भारत सरकारतर्फे बांगलादेश सरकारला कठोर इशारा दिला जावा. तसेच मानवाधिकारवादी संघटनांनी हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली."

राज्यात विविध ठिकाणी तीव्र निषेध (ETV Bharat Reporter)



बुलढाण्यात आक्रोश न्याय मोर्चा : बांगलादेशात हिंदूवर अन्याय होत आहे. त्यामुळं भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे आणि आंदोलन करण्यात येत आहेत. आज बुलढाण्यात सकल हिंदू बंधू भगिनी यांनी एकत्रित येऊन मोर्चा काढला. तर भोंडे चौक, तहसील चौक, मार्गे संगम चौक, जयस्तंभ चौक, मार्गे मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा धडकला. तर शहरांमध्ये हिंदू राष्ट्र संघटनेतर्फे हा आक्रोश मोर्चा काढला होता. यामध्ये प्रामुख्याने आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती यांच्यासह असंख्य हिंदू बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला आणि विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडं दिलं.

मनमाड येथे मोर्चा : बांगलादेशातील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज मनमाड शहर भाजपा आणि शहरातील सर्व हिंदूत्ववादी संघटना राजकीय पक्ष संस्थातर्फे तीव्र शब्दात निषेध करत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात मनमाड येथील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मंडळ अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.




हेही वाचा -

बांगलादेशात मंदिरांसह हिंदूंवर हल्ले ; पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांना हिंदू केवळ मतांसाठी हवाय, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

"बांगलादेशात अन्याय होत असलेल्या हिंदूंना भारतात आश्रय द्या", महंत रामगिरी महाराजांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details