जालना Jalna Accident : जालन्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. तुपेवाडी फाट्याजवळ एक चारचाकी विहिरीत कोसळली. चारचाकी विहिरीत कोसळल्यानं सात जणांचा बुडून मृत्यू झाला. बुडालेली काळी पिवळी जीप बाहेर काढण्यात आली असून, गाडीत 12 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सात जणांचा मृत्यू : प्रवासी पंढरपुरहून राजूर गणपतीच्या दिशेनं जात होते. दुचाकीला वाचवण्याच्या नादात जीप विहिरीत पडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या अपघातात सात जणांचा बुडून मृत्यू झाला असून, संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मदतकार्य राबवण्यात येत आहे.
पंढरपुरहून येत होते भाविक : मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीतील अनेक प्रवासी हे पंढरपूर येथून वारीवरुन आले होते. जालन्याहून ते आपल्या गावाकडं जाण्यासाठी या गाडीमधून प्रवास करत होते. या दरम्यान राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ या जीपवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. यामुळं ही जीप रस्त्यालगतच असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली, अशीही शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, गाडीतील प्रवाशांना बाहेर काढलं. तसंच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 7 मृतदेह हाती आले असून, तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. या तिघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
मृतांची नावं :
प्रल्हाद महाजन- रा. चनेगाव