छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhajinagar News : देशात वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवून पळून जाण्याचा कट रचणाऱ्या मोहम्मद जोएब खानला एनआयएनं अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालय. तसंच या तरुणांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून स्फोटकं तयार करणं, घातपात कसा घडवायचा आणि त्यानंतर काय करायचं याबाबत प्रशिक्षण दिलं जात होतं. तसंच तरुणांचं ब्रेनवॉश करण्यासाठी जोएब खान जुन्या दंगलींच्या व्हिडिओचा वापर करत असल्याचंही समोर आलय.
कट्टरवादी युवकांना जोडण्याचं काम : मोहम्मद जोएब खान याला 15 फेब्रुवारी 2024 ला एनआयएनं अटक केली होती. जोएब खान हा उच्चशिक्षित युवक असून एका आयटी कंपनीत तो नोकरी करत होता. मात्र, वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली त्यानं शहरात स्लीपर सेल्सचं जाळ पसरवण्याचं काम सुरू केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धर्म कट्टरवादी युवकांची टोळी तयार करण्याचं काम तो गेल्या अनेक वर्षांपासून करत होता. यासाठी त्यानं एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून वेगवेगळ्या भागातील माथेफिरू युवकांना एकत्र केलं. व्हॉट्सअॅप ग्रुपवर तो स्फोटकं तयार करण्याचं प्रशिक्षण देत होता. मात्र, घातपातचा कट रचण्याआधीच एनआयएनं त्याला ताब्यात घेत कारवाई केली.
जुने व्हिडिओ दाखवून युवक येतात जाळ्यात : 1988 पासून तर आजपर्यंत अनेकवेळा दहशतवादी कारवायांबाबतचे पुरावे छत्रपती संभाजीनगरातून जमा करण्यात आले आहेत. हिमायत बाग येथे झालेलं दहशतवाद्याचं एन्काऊंटर असो की वेरूळ लेणी परिसरात सापडलेली स्फोटकं, अशा घटनांमुळं दहशतवादी पाळमुळं या भागात रुजत चालली असल्याचं उघड झालय. त्यातच मोहम्मद जोएब खान यांच्यासारखी हस्तक युवकांची माथी भडकवून त्यांना दहशतवादाच्या गटात समाविष्ट करून घेतात.
उच्चशिक्षित युवक देखील कटात होतात सामील : दहशतवादी गटात समाविष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्चशिक्षित युवकांना देखील या जाळ्यात ओढण्यात आलं. असं म्हणतात की शिक्षण घेतलं तर चांगलं आणि वाईट याचं ज्ञान मिळतं. मात्र, दहशतवादी संघटनांमध्ये असलेल्या युवकांकडं पाहून या गोष्टी खऱ्या आहेत का? असा प्रश्न पडतो. मोहम्मद जोएब खान हा हस्तक उच्चशिक्षित होता, तसंच तो आयटी कंपनीत चांगल्या पदावर तो काम करत होता. तसंच त्यानं जमा केलेल्या टोळीमध्ये अनेक युवक उच्चशिक्षित आहेत. मात्र, धर्माच्या नावावर सुरू असलेल्या कट्टरवादाचा फायदा जोएब खाननं घेतला. त्यानं तरुणांच्या मनात कट्टरवाद आणि जातीवादाचं विष पसरवत आपल्याच देशाबद्दल द्वेष निर्माण केला.
छत्रपती संभाजीनगरातील 50 जण ISIS च्या संपर्कात; जुन्या दंगलींचे व्हिडिओ दाखवून तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न - ISIS Chhatrapati Sambhajinagar - ISIS CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
Chhatrapati Sambhajinagar News : इसिस (ISIS) संघटनेचं जाळं आता छत्रपती संभाजीनगरातही पसरल्याचं स्पष्ट झालंय. छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या संपर्कात असून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून या तरुणांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय.
छत्रपती संभाजीनगरात 'इसिस'चं जाळं (ETV Bharat)
Published : Jul 13, 2024, 2:03 PM IST
हेही वाचा -