बस्तर (छत्तीसगड)Ishwar Korram Rites Issue: जगदलपूरच्या डिमरपाल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ५४ वर्षीय ईश्वर कोर्राम यांचा मृत्यू झाला. ईश्वर कोर्राम यांच्यावर ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करून जमिनीत दफन करावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. मृतदेह पुरल्याची बातमी परिसरात पसरताच त्यावरून वाद निर्माण झाला. ईश्वर कोर्राम यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. अंत्यसंस्काराचा वाद वाढल्याने कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानं तात्काळ सुनावणी घेत मृतदेह दफन करण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस संरक्षणात मृतदेह दफन करण्यात यावा.
न्यायालयाच्या आदेशानुसार दफनविधीची परवानगी : न्यायालयाच्या आदेशानुसार कडक सुरक्षा व्यवस्थेत ख्रिश्चन धर्मानुसार ईश्वर कोर्राम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ईश्वर कोर्रामला डिमरापल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचारादरम्यान कोणतीही सुधारणा न झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहावर गावातच अंत्यसंस्कार करायचे होते. यावर गावातील काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर वाद वाढला. कुटुंबीय इच्छेनुसार नातेवाईकावर अंतिमसंस्कार करू शकतात, असा आदेश न्यायालयानं दिला. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून सुरक्षेत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत, अशा सूचनाही न्यायालयानं पोलिसांना दिल्या होत्या.