विखे पाटील हे शरद पवारांवर टीका करताना शिर्डी (अहमदनगर)Radhakrishna Vikhe Patil:युतीचे सरकार असताना देवेंद्र फडवणीस यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवले होते. मात्र घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी ते आरक्षण घालवले असल्याची टीका विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केलीये. जाणता राजा रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचे. मराठा आरक्षण गेल्याचा कुठलाही पच्छाताप त्यांना झाला नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे शिर्डीत उभारण्यात आलेल्या प्रचार कार्यालयाचा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. या कार्यक्रमातील भाषणा दरम्यान विखे पाटलांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांच्यावर मराठा आरक्षणावरून हल्ला चढवलाय.
अशाप्रकारे देणार मराठ्यांना आरक्षण :मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सामोरे गेले आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचा विधानभवनात विधायक आणून केला. अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला असल्याचही विखे पाटील यावेळी म्हणाले आहे. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार मधील सत्ताधाऱ्यांना पायउतार व्हावे लागले. पक्ष संपले, काही पक्षांचे सहकारी त्यांना सोडून गेले हे त्यांना कळलेच नाही. राहिलेलेसुद्धा या निवडणुकीत कधी घरी निघून जातील याचीसुद्धा खात्री राहिली नाही, अशी टीकाही विखे पाटील यांनी केली.
राऊतांना टोमणा :महाविकास आघाडीतील एक नेता दररोज सकाळी कोंबड्यासारखी बाग देतो. फक्त अंडे घालत नाही, अशी खोचक टीका विखे पाटलांनी संजय राऊतांचे नाव न घेता शिर्डीत केलीय. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू असून दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मूळ पवार आणि बाहेरचे पवार हे विधान केलं होतं. या विधानाचा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निषेध करत जी सून तुमच्या घरात चाळीस वर्ष राहिली ती मुलीसाठी तुम्हाला आता परकी वाटू लागली आहे. तुम्ही तुमच्या कुटुबीयातील व्यक्तीला आपले म्हणू शकत नाही. त्याला तुम्ही परके समजू लागले तर ही महाराष्ट्रातील जनता तुम्ही कधीच वाऱ्यावर सोडून दिली आहे. पवारांनी आजपर्यंत केवळ घरे फोडायची कामे केली. माणसावर माणसं घालायची, व्यक्तीदोषावर राजकारण करायचे एवढेच राजकारण महाराष्ट्रात पवारांनी केले असल्याची सडेतोड टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलीय.
हेही वाचा:
- इंदिरा गांधींनी गरिबी हटवण्याचं आश्वासन दिलं, मात्र त्याचं काय झालं?, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?; अमित शाहांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
- शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवार गटाच्या आमदारावर घोटाळ्याचा गंभीर आरोप; काय आहे नेमकं प्रकरण? - Navi Mumbai Market Committee
- धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातात 'तुतारी'; भाजपाला मोठा धक्का, कसंय माढ्याचं समीकरण? - Dhairyasheel Mohite Patil joins NCP